शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

६३ हजार पर्यटकांनी अनुभवला फुलोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:29 IST

पेट्री : जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळताना दिसत ...

पेट्री : जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळताना दिसत आहेत. शनिवार, रविवार सलग सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पुष्प पठाराला भेटी देत आहेत. दरम्यान, ६३ हजार पर्यटकांनी कास पुष्प पठार पाहण्यासाठी गर्दी केली होती.गेल्या दीड महिन्यापासून विविध प्रजातींच्या रंगाचा अविष्कार कासवर पाहावयास मिळाला. या हंगामाचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत. फुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पुष्प पठार कासवर या हंगामातील सर्वात शेवटची मिकीमाऊसची पिवळ्याधमक रंगांच्या छटेने पठार बहरले आहे.आॅगस्ट मध्यानंतर कासवर विविध प्रजातींची फुले यायला सुरुवात होते. प्रथमत: पांढरे गेंद व निळी सीतेची आसवं या फुलांच्या गालिचाने पठार निळे, पांढरे भासत आहे. ही फुले चालू असतानाच गणपती उत्सवाच्या दरम्यान जांभळ्या तेरड्याचे मोठ्या प्रमाणात आगमन होते. सप्टेंबर महिन्यात तेरड्याचे गालिचे सर्वदूर दिसतात आणि पठाराला गालिचांचे स्वरूप प्राप्त होते.पांढरे गेंद, निळी सीतेची आसवे व जांभळा तेरडा या फुलांच्या प्रचंड प्रमाणात येण्याने पठार अक्षरश: विविध रंगात न्हाऊन जातं. या मोठ्या प्रमाणात येणाºया फुलांबरोबर वायतुरा, चवर, पांढरी आमरी, कळलावी, पहाडवेल, धायटी, दगडी शेवाळ, झुंबर, जरतारी, भुईकारवी, विघ्नहर्ता, तुतारी, गौळण, भारंगी, पंद, दीपकांडी, अभाळी, नभाळी, कंदीलपुष्प, पाषाणी, ड्रॉसेरा ईडीका, ड्रॉसेरा बर्मानी आदी विविधरंगी फुलेही पठाराच्या सौंदर्यात भर घालत आहेत.सर्वात शेवटचा रंगोत्सव आॅक्टोबर महिन्यात पठारावरील तेरडा, पांढरे गेंद व निळी सीतेची आसवं ही फुले जाऊन मिकीमाऊस म्हणजेच स्मितीया किंवा कावळा ही पिवळ्या रंगांची फुले पठारावर येतात. त्यांच्या जोडीला सोन्याच्या रंगाची पिवळ्या सोनकीचे सडे जागोजागी दिसतात. त्यामुळे पठार पिवळे धम्मक दिसत आहे. हा पिवळ्या रंगाचा सोहळा अजून आठ ते पंधरा दिवस चालण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.अजून पंधरादिवस हंगामयावर्षी कास पठार कार्यकारी समितीमार्फत सप्टेंबरपासून हंगामाची सुरुवात करण्यात आली. हंगामाच्या सुरुवातीपासून ६३ हजार पर्यटकांनी कास पठार पाहिले आहे. अजून पंधरा दिवस हंगाम चालू राहिल्यास हाआकडा पंधरा ते वीस हजारांनी वाढणार आहे.