शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

वळवानं तोंड फिरविलं... ... उन्हानं अंग करपलं !

By admin | Updated: May 27, 2016 22:20 IST

कुठे दडलाय पाऊस? : मान्सून अंदमानात; पण जिल्ह्यात केवळ काळ्या नभाच्या वाकुल्या--दुष्काळी व्यथा...

सातारा : मे महिना अखेरपर्यंत वळवाने सातारकरांना केवळ वाकुल्या दाखविल्या. काळे ढग जमून आले; पण कुठेतरी नुसते ‘भुंरगाट’ पडले, याने ना पिण्याच्या पाण्याची सोय झाली, ना रानातले नांगरटीचे ढेकूळ फुटले! ४२ अंशावर गेलेल्या पाऱ्यामुळे अंग करपून निघाले, कवी कल्पनेतल्या चातक पक्ष्यासारखी जिल्ह्यातल्या लोकांची अवस्था होऊन बसली असून, पाऊस कुठे दडून बसलाय?, असा प्रश्न जो-तो विचारत आहे.जिल्ह्यावर न भूतो...न भविष्यती, अशा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. १९७२ मध्येही जेवढा नव्हता, त्यापेक्षाही मोठा व भयानक दुष्काळ पडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. महाबळेश्वर तालुका वगळता इतर तालुक्यांत अगदी तुरळक पाऊस झाल्याने खरीप पिके उन्मळून पडली आहेत. दुष्काळी भागातील तलाव कोरडे पडले आहेत, तर विहिरींनी तळ गाठला असल्याने माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांवर स्थलांतराची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. पाऊस नसल्याने बांधावर, माळरानावर गवतच उगवले नसल्याने चाराटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. फलटण तालुक्यात सर्वात कमी ९४.६ मिमी इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात पावसाची सरासरी ३८२ मिमी इतकी आहे. सरासरीच्या केवळ २४ टक्के पाऊस या तालुक्यात झालेला आहे. त्या खालोखाल कोरेगाव तालुक्यात १८०.४ मिमी म्हणजे सरासरीच्या २८ टक्के पाऊस झाला आहे.वळवाने दुष्काळी भागात काही ठिकाणी हजेरी लावली, जलयुक्त शिवारच्या कामांमुळे काही ठिकाणी बंधारे भरले; पण वळीव पाऊस सर्वत्र सारखा पडत नसल्याने एका गावात पाणी तर लगतच्या गावात कोरड, अशी वस्तुस्थिती आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात धरणे आहेत, या धरणांतून पिण्याच्या पाण्याची सोय झाली, आता मात्र ही धरणेही तळ गाठू लागली आहेत. या परिसरात वळवाने हुलकावणी दिली असल्याने धरणे कोरडी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. नैऋत्य मान्सूनने अंदमानमध्ये हजेरी लावली, तो पुढे सरकत केरळमार्गे देशात दाखल होईल, तोपर्यंत पाण्यावाचून तगमग कायम राहणार आहे, याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही.(प्रतिनिधी)नशिवारं मोकळी...पाण्याअभावी अनेक ठिकाणी द्राक्ष, डाळिंबाच्या बागा करपून गेल्या. सर्वात जास्त पाणी लागणारे उसाचे पीकही अल्प प्रमाणात उरले आहे. शिवारं मोकळी ठाक पडली आहेत. उन्हाळी पिके तर झालीच नाहीत. नांगरटीचे ढेकूळही अद्याप फुटलेले नाहीत. आता खरिपाची पेरणी कशी होणार?, हा प्रश्न आहे.