कास पठारावरील कुमूदिनी तलाव भरला, तलावाला 'अस' पडलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 04:25 PM2022-07-05T16:25:20+5:302022-07-05T16:27:56+5:30

फेब्रुवारी अखेर हा तलाव वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवतो.

The rains flooded Kumudini Lake on the Kaas plateau | कास पठारावरील कुमूदिनी तलाव भरला, तलावाला 'अस' पडलं नाव

छाया : प्रियंका चव्हाण

googlenewsNext

पेट्री (सातारा): जागतिक वारसास्थळ म्हणून कास पठाराची ओळख आहे. या कास पठारापासून राजमार्गावरील तीन किमी अंतरावरील फुलांच्या हंगामात हजारो पांढऱ्या शुभ्र कमळांची पर्वणी देणाऱ्या कुमुदिनी तलावातील पाणी फेब्रुवारी अखेरला पूर्णपणे आटले होते. मान्सूनची गेल्या आठ दहा दिवसांपासून संततधार तसेच कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा कुमुदिनी तलाव पूर्ण भरला आहे. या तलावालाच स्थानिक ग्रामस्थ सरवारतळे असे म्हणतात.

कुमुदिनी (पानभोपळी) नायफांडिस इंडिका ही वनस्पती कास पठारावरील महाबळेश्वर राजमार्गावर असणाऱ्या तलावात आढळून येते. म्हणून या तलावाला कुमुदिनी तळे नाव पडले. फुलांच्या हंगामात पांढऱ्या शुभ्र कमळांची पर्वणी तर फेब्रुवारी अखेर हा तलाव वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवतो. सातासमुद्रापार ओळख असलेला हा कुमुदिनी तलाव सध्या पुर्णतः भरला आहे. याच तलावामध्ये सप्टेंबर दरम्यान नायफांडिस इंडिका (पान भोपळी) ही हजारो पांढरी शुभ्र कमळे फुललेली पाहायला मिळत असतात.

Web Title: The rains flooded Kumudini Lake on the Kaas plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.