Satara Crime: सोन्याची बिस्किटे वाटून घेऊ म्हणत वृद्धेचे गंठण लांबविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:32 IST2025-12-11T18:31:46+5:302025-12-11T18:32:47+5:30
सातारा : सोन्याचे बिस्कीट सापडले आहे, ते सर्वांनी वाटून घेऊ, असे म्हणत एका वृद्धेचे गळ्यातील सुमारे दोन लाखांचे अडीच ...

Satara Crime: सोन्याची बिस्किटे वाटून घेऊ म्हणत वृद्धेचे गंठण लांबविले
सातारा : सोन्याचे बिस्कीट सापडले आहे, ते सर्वांनी वाटून घेऊ, असे म्हणत एका वृद्धेचे गळ्यातील सुमारे दोन लाखांचे अडीच तोळ्यांचे गंठण चोरून नेले. ही घटना ७ रोजी सकाळी ११ वाजता राधिका रस्त्यावरील कदम पेट्रोलपंपासमोर घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताबाई भाऊ देवकर (वय ६०, रा. देवकरवाडी, निगडी, ता. सातारा) या कदम पेट्रोल पंपासमोरून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी तीन तरुण त्या ठिकाणी आले. देवकर यांना त्यांनी सोन्याचे बिस्कीट सापडले आहे. ते आपण सगळ्यांनी वाटून घेऊ, पण तुमच्या गळ्यातील गंठण काढून द्या, असे सांगितले.
त्यानंतर देवकर यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण काढून दिले. यानंतर चोरट्यांनी तेथून पलायन केले. देवकर यांनी ९ रोजी या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद असून, हवालदार मोरे हे अधिक तपास करीत आहेत.