Satara: चारित्र्याच्या संशयातून डोक्यात फावडे घालून पत्नीचा खून; पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 11:52 IST2024-03-04T11:52:08+5:302024-03-04T11:52:47+5:30

ठसे तज्ज्ञांना पाचारण

The husband killed his wife due to suspicion of character in Dhayati Satara District | Satara: चारित्र्याच्या संशयातून डोक्यात फावडे घालून पत्नीचा खून; पतीला अटक

Satara: चारित्र्याच्या संशयातून डोक्यात फावडे घालून पत्नीचा खून; पतीला अटक

कऱ्हाड : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फावडे मारून तिचा निर्घृणपणे खून केला. ही घटना पाटण तालुक्यातील धायटी येथे शनिवारी रात्री घडली. कोमल रमेश पेंढारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती रमेश शंकर पेंढारे याला पोलिसांनी अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायटी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर पेंढारे हे मुलगा रमेश व सून कोमल यांच्यासह राहतात. रमेशचा विवाह दीड वर्षांपूर्वी मारुल हवेली येथील कोमल हिच्याशी झाला होता. पती रमेश हा पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. शनिवारी रात्री रमेश घरी आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी रमेश याने वडिलांना घराबाहेर ढकलत घराचे दार लावून घेतले.

तसेच, घरात असलेले फावडे पत्नी कोमल हिच्या डोक्यात मारून तिचा निर्घृणपणे खून केला. या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले तपास करीत आहेत.

ठसे तज्ज्ञांना पाचारण

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांच्यासह मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक चेतन मछले, उपनिरीक्षक रामराम वेताळ, हवालदार सिद्धनाथ शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी रमेश पेंढारे याला अटक केली. रात्री उशिरा ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. उपअधीक्षक सविता गर्जे यांनी घटनास्थळी थांबून अधिक तपासकामी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Web Title: The husband killed his wife due to suspicion of character in Dhayati Satara District