शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
5
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
7
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
8
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
9
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
10
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
11
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
12
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
13
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
14
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

Satara: फलटणमध्ये उमेदवार बाजूलाच, नेत्यांमध्येच खरी लढाई; रामराजे अन् रणजितसिंह निंबाळकर आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 12:20 IST

महाआघाडी अन् महायुती समोरासमोर ठाकणार

विकास शिंदेफलटण : फलटण विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत ही चर्चेची असणार आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघावर गेली पस्तीस वर्षे एकहाती रामराजे यांची सत्ता आहे. फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा या सर्व ठिकाणी रामराजे आणि बंधू संजीवराजे व रघुनाथराजे यांचीच सत्ता पाहायला मिळाली आहे. ज्या ज्या वेळी विरोधक म्हणून नवे नेतृत्व उभे राहिले त्या त्या वेळी रामराजे यांनी त्यांची राजकीय ताकत दाखवली आहे. परंतु लोकसभेसारखी महत्त्वाची निवडणूक जिंकून माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी नवीन सक्षम विरोधक म्हणून राजेगटाला आव्हान दिले.फलटण अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात दीपक चव्हाण तीन वेळा आमदार झाले. यावेळी त्यांचे तिकीट कायम राहिले आणि रामराजे यांनी राखून ठेवलेले डाव बाहेर काढले, तर दीपक चव्हाण चौथ्यांदा आमदार होऊन इतिहास घडवतील.रणजितसिंह यांनी शेतकरी बागायतदार कुटुंबातील सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी मोठ्या जल्लोषात जाहीर केली. गेली दोन वर्षे त्यांचे फलटण कोरेगावमध्ये दौरे सुरू आहेत. भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. ते जनतेला किती रुचतात हेही तितकेच महत्त्वाचे.महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?१४ ऑक्टोबरला फलटण येथील भव्य सभेत संजीवराजे व आमदार दीपक चव्हाण कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. परंतु शरद पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी या सभेत जाहीर केली नाही. त्यामुळे दीपक चव्हाण हेच शेवटपर्यंत उमेदवार असणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.२५५ फलटण विधानसभा

  • एकूण मतदार - ३३८४६४
  • पुरुष मतदार - १७२४५९
  • स्त्री मतदार - १६५९९१
  • इतर मतदार - १४ 

२०१९ विधानसभा निकालउमेदवार   - मिळालेली - टक्केवारी

  • दीपक चव्हाण - राष्ट्रवादी ११७६१७ - ५४.५५%
  • दिगंबर आगवणे - भाजप ८६६३६ - ४०.१८%
  • अरविंद आढाव - वंबआ ५४६० - २.५३%
टॅग्स :Satara areaसातारा परिसरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४phaltan-acफलटणRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024