Phaltan Doctor Suicide Case: गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:02 IST2026-02-14T18:02:21+5:302026-02-14T18:02:45+5:30

Phaltan Doctor Women Suicide Case: येथील सरकारी डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी संशयित असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा जामीन ...

The court rejected the bail application of dismissed police sub-inspector Gopal Badne, who is suspected in the suicide case of a government doctor in Phaltan | Phaltan Doctor Suicide Case: गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फेटाळला

Phaltan Doctor Suicide Case: गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फेटाळला

Phaltan Doctor Women Suicide Case: येथील सरकारी डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी संशयित असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा जामीन अर्ज फलटण येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

याबाबत माहिती अशी, फलटण येथील वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी संशयित गोपाळ बदने (३५, मुळ रा. चांदापूर, ता. परळी, जि. बीड, हल्ली रा. बिरदेवनगर, जाधववाडी, ता. फलटण) व प्रशांत किसन बनकर (२९ रा. बनकर निवास लक्ष्मीनगर, फलटण) हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. यामधील गोपाळ बदने याने जामिनासाठी फलटण येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 

या दाखल जामीन अर्जावर न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाने दोष पत्रातील प्रथमदर्शनी आलेले तांत्रिक पुरावे व युक्तिवादाच्या आधारे बदने यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयामध्ये आरोपी पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आली. त्यास सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील वैभव काटकर व सरकारी पक्षाला मदत म्हणून मूळ फिर्यादीचे वकील सदाशिव सानप यांनी व्यक्तिवाद केला.

Web Title : फलटण डॉक्टर आत्महत्या: गोपाल बदने की जमानत याचिका खारिज

Web Summary : फलटण डॉक्टर आत्महत्या मामले में संदिग्ध गोपाल बदने की जमानत याचिका अतिरिक्त सत्र न्यायालय ने खारिज कर दी। बदने और एक अन्य आरोपी न्यायिक हिरासत में हैं। अदालत ने दोनों पक्षों को सुनने के बाद सबूतों और तर्कों का हवाला दिया।

Web Title : Phaltan doctor suicide: Gopal Badane's bail application rejected.

Web Summary : Gopal Badane, a suspect in the Phaltan doctor suicide case, had his bail application rejected by the Additional Sessions Court. Badane and another accused are in judicial custody. The court cited evidence and arguments in its decision after hearing both sides.