शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:13 IST

आनंदराव शामराव साळुंखे (रा. रुवले, ता. पाटण) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्याबाबत सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र शहा ...

आनंदराव शामराव साळुंखे (रा. रुवले, ता. पाटण) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्याबाबत सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही क्षयरोगाने ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत ती घरात एकटी असल्याचे पाहून आनंदराव साळुंखे हा तिच्या घरामध्ये गेला. त्याने तिच्यावर अत्याचार करून याबाबत कोणाला काही सांगितल्यास त्याच्या जीपने धडक देऊन आई व वडिलांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. त्यामुळे पीडितेने याबाबत कोणाला काहीही सांगितले नाही. त्यानंतर काही दिवसांनी मुलीला त्रास होऊ लागल्यामुळे कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तपासणी केली असता पीडिता गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबीयांनी मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिच्याबाबतीत घडलेला प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसात गुन्हा नोंद करून ३ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपी आनंदराव साळुंखे याला अटक करण्यात आली. तत्कालीन पोलीस निरीक्षक डी. डी. चौगुले यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने सतरा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस दोषी धरून सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

- चौकट

... अशी आहे शिक्षा

न्यायालयाने आरोपीला दोषी धरून अनाधिकाराने घरात प्रवेश केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस कैद, धमकी दिल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस कैद आणि अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड पीडित मुलीला भरपाई तसेच दंड न दिल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे.