शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेत संघ-समितीतच होणार लढत

By admin | Updated: June 12, 2015 00:47 IST

दुरंगीचे चित्र स्पष्ट : २१ जागांसाठी ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात

कुडाळ : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक समिती विरोधी प्राथमिक शिक्षक संघ यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. बँकेच्या २१ जागांसाठी एकूण ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. काही इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्याने आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडाचे निशाण फडकावले आहे. ९ मतदारसंघांत दुरंगी तर १२ मतदारसंघांत तिरंगी लढत होणार, असे राजकीय चित्र सध्या स्पष्ट झाले आहे. तरीही मुख्यत: संघविरोधी समिती असाच सामना रंगणार आहे.माजी आमदार शिवाजीराव पाटील गट तसेच अखिल भारतीय शिक्षक संघ (दोंद गट) या निवडणुकीत कोणाबरोबर जाणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर दोंद गट सत्ताधारी समितीबरोबर तर शिवाजीराव पाटील गट संघाबरोबर राहिला आहे. दोन्ही संघ एकत्र आल्याने समितीला सत्ता मिळविणे कठीण होणार, हे निश्चित मानले जात आहे. दोंद गट समितीशी हात मिळवून दोन जागा लढवित आहे. तर समिती १९, शिवाजीराव पाटील गट ९ जागांवर तर थोरात गट १२ जागांवर निवडणूक लढविणार आहे.सर्वसाधारण गटात उरलेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे : कऱ्हाड-पाटण २, नागठाणे ३, आरळे २, परळी ४, वाई २, गिरवी ४, जावळी ३, खंडाळा ४, कोरेगाव २, महाबळेश्वर २, फलटण ४, रहिमतपूर २, खटाव २, मायणी २, दहिवडी ४, म्हसवड २ तर राखीव गटात अनुसूचित जाती-जमाती ४, विमुक्त जाती ३, इतर मागास ४, महिला राखीव ६ असे एकूण ६१ उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत. नागठाणे गटात नाट्यमय घडामोडींनंतर अंगापूरचे बी. एस. कणसे यांची संघातून उमेदवारी निश्चित असताना उमेदवारीचा हट्ट धरून बसलेल्या राजेंद्र घोरपडे यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. तर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक यांनी आपल्या तालुक्याला इतर मागास प्रवर्गातून गणेश तोडकर यांनी उमेदवारी देऊन झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत शिक्षक संघ एकत्र आला आहे; परंतु संघात व समितीत उमेदवारांनी बंडखोरी केल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. (प्रतिनिधी)दोंदे गटाने दिली महिलेला संधीशिक्षक बँक निवडणुकीत अखिल भारतीय शिक्षक संघ (दोंद गट) या एकमेव संघटनेने सर्वसाधारण गटातील आरळे मतदारसंघात रजनी चव्हाण या महिलेला संधी दिली आहे. त्यामुळे या गटातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.नगरपालिकेला २५ वर्षांनंतर संधीशिक्षक बँक निवडणुकीत नगरपालिका शाळांमधील शिक्षक सभासदांना २५ वर्षांपूर्वी उमेदवारी मिळाली होती. आता यावेळेला सातारा नगरपालिकेतील ज्ञानेश्वर बबन कांबळे यांना अनुसूचित जाती-जमाती गटातून शिवाजीराव पाटील गटाकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे २५ वर्षांनंतर नगरपालिकेला उमेदवारीची संधी मिळाली.