शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आॅडिटच्या नावाखाली शिक्षकांची लुबाडणूक

By admin | Updated: January 21, 2015 23:49 IST

विविध विषयांवरून गदारोळ : ९० हजार रुपये गोळा केल्याचा विजय पवार यांचा आरोप

पाटण : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे आॅडिट सुरू असून, त्याचा खर्च भागविण्यासाठी केंद्र प्रमुखांनी तालुक्यातील ६१८ शाळांकडून प्रत्येकी दीडशे रुपये वसूल केले. ध्वजनिधी म्हणून शिक्षकांकडून प्रत्येकी ७५ रुपये घेतले, असे सुमारे ९० हजार रुपये गोळा केल्याचा आरोप सदस्य विजय पवार यांनी सभागृहात केला.सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत वेगवेगळ्या विषयांवरून जोरदार गदारोळ झाला. शिक्षकांकडून पैसे उकळले. मात्र, त्याच्या पावत्या देखील दिलेल्या नाहीत. तेव्हा चुकीच्या प्रथा पाडू नका, असे विजय पवार व रामभाऊ लाहोटी म्हणाले. याबाबत गटशिक्षणाधिकारी विलास भागवत म्हणाले, ‘केंद्रप्रमुखांना याची विचारणा केली जाईल व चौकशीअंती तथ्य आढळल्यास कारवाई करू. ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाचा केवळ देखावा न करता परिणाम जाणवला पाहिजे, असा उपक्रम राबविला पाहिजे. अन्यथा सकाळी शाळा तपासणी केल्यानंतर त्या शाळेवरील शिक्षक मनधरणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या घरी येण्यापुरता नको, असे राजाभाऊ शेलार म्हणाले. मोरेवस्ती वाझोली शाळेत वीज नाही, असे सभापती म्हणाल्या. तालुक्यातील १२ गावांमध्ये दूषित पाणी झाले आहे. यामध्ये तळमावले, कुंभारगाव, गुढे, काढणे, धावडे, बिबी, धडामवाडी, हेळवाक आदी गावांचा समावेश आहे.वनक्षेत्रपाल जी. एन. कोल्हे व विजय साळी हे मासिक सभांना गैरहजर राहतात, ते कोणाला जुमानत नसल्याचे उपसभापती म्हणाले. पाटण तालुक्यातील ४०९ पोलिओ केंद्रांवर २२,९०६ बालकांना पोलिओचा डोस दिला असल्याचे वैद्यकीय अधिकारी घाडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अधिकार गाजवायचे का ?तेराव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची सुमारे अडीच लाखांची रक्कम पाटणकर गटाच्या सभापती गुरव व देसाई गटाचे सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी विकासकामांसाठी घेतली. यावरून देसाई गटाचे उपसभापती डी. आर. पाटील व रामभाऊ लाहोटी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. उपसभापती डी. आर. पाटील म्हणाले, ‘सभापतींनी सभागृहाला विश्वासात न घेता अधिकार गाजवायचे का? त्यानंतर पाटणकर गटाच्या राजेश पवार यांनी उपसभापती नामधारी आहेत काय ? असे सांगून उपसभापतींचे समर्थन केले.