शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांमुळे संस्कारक्षम व्यक्ती घडल्या

By admin | Updated: February 9, 2015 00:47 IST

पालकमंत्री : जानुगडेवाडी येथे प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा

सणबूर :‘समाजीतील पुढची पिढी संस्कारक्षम घडविण्याचे पवित्र काम शिक्षक करतो. जबाबदारीची जाणीव ठेवून पेशाशी व समाजाशी निष्ठेने राहून सात्विकपणे व प्रामाणिकपणे काम केले तर त्याचे फळ निश्चित मिळते. शिक्षकांमुळे संस्कारक्षम व्यक्ती घडल्या आणि यापुढे घडणार आहेत,’ असे प्रतिपादन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. जानुगडेवाडी, ता. पाटण येथे पालकमंत्री विजय शिवतारे व आमदार शंभूराज देसाई यांचा सत्कार व प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजीराव पाटील अध्यक्षस्थानी होते. मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, उपसभापती डी. आर. पाटील, माजी सभापती वनिता कारंडे, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य रघुनाथ माटेकर, शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके, महेंद्र जानुगडे, मोहनराव जाधव, रामचंद्र लावंड, पोपटराव कणसे, विजयराव थोरात, राजेंद्र बागल, विष्णू खताळ, बाळासाहेब पाटील, मच्छिंद्र मुळीक, राजेंद्र घोरपडे, राजेंद्र बोराटे, समीर बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री शिवतारे म्हणाले, ‘आयुष्यात प्राथमिक शिक्षणाला महत्त्व आहे. जर प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाला, तरच त्याची चांगली इमारत उभी राहणार आहे.’ यावेळी आमदार शंभूराज देसाई, संभाजीराव थोरात, महेंद्र जानुगडे आदींची भाषणे झाली. अर्जुन पाटील यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील भिलारे यांनी आभार मानले. (वार्ताहर)