Suspected death of woman in Kagal | कागलमधील महिलेचा साताऱ्यात संशयास्पद मृत्यू

कागलमधील महिलेचा साताऱ्यात संशयास्पद मृत्यू

ठळक मुद्देकागलमधील महिलेचा साताऱ्यात संशयास्पद मृत्यूघातपाताचा संशय : पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : येथील शाहूनगरमधील एका फ्लॅटमध्ये लक्ष्मी तानाजी कांबळे (वय ४०, रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) या महिलेचा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मी कांबळे या गेल्या दोन महिन्यांपूर्वी साताऱ्यात आल्या होत्या. त्यांची दोन मुले आणि सासू गावाकडे वास्तव्यास आहेत. साताऱ्यातील शाहूनगरमध्ये त्यांनी भाड्याने फ्लॅट घेतला होता. त्या रोज सेंट्रिंगच्या कामावर जात होत्या.

दोन दिवसांपासून त्यांचा फ्लॅट बंद होता. गुरुवारी सायंकी फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरवाज्याला आतून कडी लावली नव्हती. पोलीस फ्लॅटमध्ये गेल्यानंतर लक्ष्मी कांबळे यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

मृतदेहाच्या अंगावर जखमा नाहीत. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. दरवाजा उघडा असल्यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अवाहल प्राप्त झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. मोरे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Suspected death of woman in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.