Satara- Phaltan Doctor Death: सुषमा अंधारे आज फलटणमध्ये; रणजितसिंह यांच्याकडून खुल्या चर्चेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:01 IST2025-11-03T13:57:53+5:302025-11-03T14:01:15+5:30
खुले आव्हान कोण-कोण स्वीकारणार, याकडे साऱ्या राज्याचे लक्ष

Satara- Phaltan Doctor Death: सुषमा अंधारे आज फलटणमध्ये; रणजितसिंह यांच्याकडून खुल्या चर्चेचे आवाहन
सातारा : उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या आज, सोमवार, (दि.३) फलटण येथे येत आहेत, तर माजी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनी सायंकाळी सहा वाजता आरोपासंदर्भात खुल्या चर्चेचे आवाहन केले आहे. हे त्यांचे खुले आव्हान कोण-कोण स्वीकारणार, याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
पीडित डाॅक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर व त्यांच्या स्वीय सहायकावर आरोप केले जात आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह यांनी फलटण येथील गजानन चाैकात खुल्या चर्चेचे आवाहन केले आहे.
वाचा : मंत्री गोरेंना चॅट वाचायचा अधिकार कोणी दिला, संध्या सव्वालाखे यांचा सवाल
दरम्यान, उध्दव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या सकाळी दहा वाजता फलटण शहर पोलिस ठाण्याला तसेच उपजिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. या भेटीनंतर रणजितसिंह यांचे आवाहन त्या स्वीकारणार का, याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.
साेशल मीडियावर आवाहन
सुषमा अंधारे, मेहबूब शेख, आंबादास दानवे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या खुर्च्या सन्मानपूर्वक राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या खुल्या चर्चेत आपल्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी आपणास आमंत्रण देत आहोत, असे आवाहनही सोशल मीडियाद्वारे करण्यात आले आहे.