संभाजीराजेंच्या आंदोलनाला वाईमधून पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:50+5:302021-06-17T04:26:50+5:30

वाई : मराठा समाजावर झालेल्या अन्यायकारक घटना आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर लाखोंच्या संख्येने शांततापूर्वक आंदोलन केली. ...

Support for Sambhaji Raje's movement from Wai | संभाजीराजेंच्या आंदोलनाला वाईमधून पाठिंबा

संभाजीराजेंच्या आंदोलनाला वाईमधून पाठिंबा

वाई : मराठा समाजावर झालेल्या अन्यायकारक घटना आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर लाखोंच्या संख्येने शांततापूर्वक आंदोलन केली. राज्यभर मूक आंदोलन करण्यात येत असून खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वाई तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका रिव्ह्यू पीटिशन दाखल करावी, जस्टिस गायकवाड आयोगाच्या शिफारसींचा बचाव करावा, न्यायालयाने रिव्ह्यू पीटिशन अमान्य केल्यास दुसरा पर्याय क्युरेटिव्ह पीटिशनचा उपलब्ध आहे. त्यासाठी ३३८६ लुसार राज्याने प्रस्ताव तयार करून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे तो पाठवावा. राष्ट्रपती त्यांच्या अधिकारात त्याला मंजुरी देऊ शकतात किंवा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे विचारार्थ पाठवावी. पुढील लढ्याची रणनीती ठरविण्यात आली असून लवकरच रस्त्यावर उतरून मोठा लढा उभारण्याच्या तयारीत मराठा क्रांती मोर्चा आहे, असाही इशारा दिलेल्या निवेदन देण्यात आला आहे. यावेळी मराठा समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Support for Sambhaji Raje's movement from Wai