शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Accident news Satara: बोंबाळे येथे ऊस वाहतूक ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; महिला ठार; ट्रॅक्टर चालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 17:46 IST

पाठीमागील चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला

कातरखटाव : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. हा अपघात भिगवण-सांगली मार्गावर खटाव तालुक्यातील बोंबाळे हद्दीत झाला. सुनीता हरिदास कुलकर्णी (वय ३२, रा. डांभेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, डांभेवाडी येथील हरिदास रामदास कुलकर्णी आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघे गोंदवलेहून दुचाकी (एमएच १४ सीझेड २७५१)ने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता कातरखटावकडे येत होते. त्याचवेळी त्याच मार्गाने निघालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसली. यामध्ये पाठीमागील चाकाखाली सापडल्याने सुनीता कुलकर्णी या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला. दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरखाली महिला सापडल्याने ठार झाल्याची अपघातस्थळावरून माहिती मिळाली. या अपघाताची वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, रात्री उशिरापर्यंत तक्रार, पंचनामा प्रक्रिया सुरू होती. सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराजे देशमुख, हवालदार सविता वाघमारे तपास करीत आहेत.विना नंबरप्लेटचे ट्रॅक्टरभिगवण-सांगली रस्त्यावर अनेक वर्षांपासून अपघाताची मालिका सुरू आहे. या महामार्गावर साइडपट्ट्या, खड्डे वारंवार पडत असल्यामुळे नेहमी अपघात होत आहेत. कर्णकर्कश आवाजात वाहन चालवणे, अपघात झाला की पळून जाणे असा वाहतूक चालकांचा प्रकार दिसून येत आहे. याला वाहतूक पोलिसांनी चांगलीच समज देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात