शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटी निवडणुकीत साखर पेरणी

By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST

ग्रामपंचायतीची रंगीत तालीम : फलटण पश्चिम तालुक्यातील चित्र

आदर्की : फलटण पश्चिम भागातील सोसायटी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत असतानाच सहा महिन्यांवर ग्रामपंचायत मुदत संपत असल्याने गावागावांत सोसायटीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीची साखर पेरणी होत आहे.फलटण पश्चिम भागात राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या सहकारी सोसायट्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यावेळी भाजप-शिवसेना, मित्र पक्षाची सत्ता राज्यात व केंद्रात असल्याने विधानसभा निवडणुकीत आयाराम-गयारामाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सोसायटी निवडणूक जाहीर होताच आयाराम-गयाराम जागे झाले आहेत.फलटण पश्चिम भागात हिंगणगाव, सासवड, कापशी सोसायटीच्या निवडणुका चुरशीने होतात. त्यामुळे सभासद शेतकरी वर्गाचा बाकी आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आळजापूर, बिबी सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध होतात; परंतु धोम-बलकवडीचे पाणी आल्याने उसाबरोबर नगदी पिकासाठी पीक कर्जाची गरज वाढणार आहे. त्यामुळे या गावचेही सभासद जागे झाले आहेत. सोसायटी निवडणुका होताच हिंगणगाव, बिबी, वाघोशी, कोऱ्हाळे, कापशी, आळजापूर आदी ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी आगामी महिन्यात संपणार असल्याने अनेक सोसायटीत सत्ता असणाऱ्या नेत्यांनी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून आगामी ग्रामपंचायतीचे गाजर संबंधितांना दाखवत असल्याचे चित्र फलटण तालुक्यात दिसत आहे. (वार्ताहर)लक्ष्य ग्रामपंचायत!राज्यात सत्ता बदल झाल्याने राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी विरुद्ध महायुती काही कार्यकर्ते गावाअंतर्गत गटबाजीचा फायदा घेणार असल्याची चर्चा आहे. सोसायटी निवडणुकीत ग्रामपंचायतीची साखर पेरणी होत आहे.