शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी भागविली भक्तांची तहान

By admin | Updated: February 9, 2015 00:47 IST

कुसुंबी यात्रेत उभारली पाणपोई : ग्रामस्थांनी केले कौतुक

कुडाळ : कुसुंबी, ता. जावळी येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेत दरवर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून अनेक भाविक हजेरी लावतात. त्यामुळे या यात्रेला एक अनोखे महत्त्व असते. यात्रेत देवीच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासून रांगेत उभे असतात. अशा भाविकांना यात्राकाळात पिण्याचे पाणी रांगतेच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कुसुंबी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी पाणपोई उभी करून भाविकांना जागेवरच पाणी वाटप करीतआहेत. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.विविध स्पर्धांमध्ये यशस्वी परंपरा सांभाळणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले आहे. त्याचबरोबर शाळेत दिल्या जाणाऱ्या संस्काराचे दर्शनही घडवले आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही भाविक गर्दी करतात. काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट या भाविकांना, यात्रेकरूंना विविध सुविधा पुरविण्याचे काम करीत असते. तरी देखील ट्रस्टच्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या वतीने कुसुंबी यात्रेत पाणीपोई सुरू करून भाविकांची तहान भागविली तसेच विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमात शाळेतील प्रदीप टपळे, तुकाराम शेलार, शीतल बुधावले, लहू पिंपळे यांनीही सहभाग नोंदविला. तर शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे भाविकांसह काळेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष किसनशेट चिकणे, राम कदम, व्यवस्थापन अध्यक्ष संतोष चिकणे, तुकाराम वेंदे, साधू चिकणे, जयसिंग चिकणे आदींसह ग्रामस्थांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)काळेश्वरी देवीच्या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने शाळेतील ५२ विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून राबविलेला पाणपोईचा उपक्रम कौतुकास्पद होता.-तुकाराम शेलार, शिक्षक कुसुंबी शाळापाणी घ्या पाणीमंदिर परिसरात भाविक काळेश्वरी देवीचा जयघोष करीत होते. यात्रेचा जागराचा दिवशी शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी पाणपोईसाठी दोन-चार बॅरेल स्वच्छ पिण्याचे पाणी भरून ठेवले होते. व सकाळपासूनच विद्यार्थी रांगेतील भाविकांना ‘पाणी घ्या पाणी’ करत पाण्याची सोय करीत होते.