शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय मंजुरीची कामे थांबवा

By admin | Updated: January 13, 2015 00:05 IST

पालकमंत्र्यांची सूचना : नवीन कामांची टेंडरप्रक्रिया थांबवा; अन्यथा ओढवणाऱ्या प्रसंगाला सामोरे जा

सातारा : ‘जिल्ह्यामध्ये जी प्राथमिकतेची कामे आहेत, ती पूर्ण करा. केवळ प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, अशी कामे तत्काळ थांबवा, अन्यथा कोणतीही तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाच त्याला तोंड द्यावे लागेल,’ असा इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सोमवारी नियोजन भवनात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिला. आघाडी शासनाने जाता-जाता अनेक कामांना प्रशासकीय मान्यता देऊन ठेवली आहे. यापैकी अनेक कामे अनावश्यक आहे. जिल्ह्यात अनेक गावे अशी आहे की, जिथे मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. अशा ठिकाणी कामे होणे गरजेचे आहे. पूर्वी मंजूर कामे थांबविण्यात कोणतेही राजकारण नाही. त्यामुळे नवीन कामांची टेंडरप्रक्रिया राबवू नका. त्यातूनही कामे केल्यास ओढवणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायची तयारी ठेवा, असेही शिवतारे म्हणाले. जिल्हा नियोजन मंडळाकडून होणारी कामे तसेच साकव पुलाची कामे ही गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांचा दर्जा टिकून राहावा, यासाठी ती कामे बांधकाम विभागामार्फतच करायला हवीत. असेही त्यांनी सांगितले. जिहे-कठापूर योजनेबाबत पे्रझेंटेशन सुरू असताना गमतीदार प्रकार समोर आला. यासाठी तीन पंप हाऊस आहेत, यापैकी पहिल्या पंपाचं काम अपूर्ण आहे; परंतु पुढच्या दोन पंपांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या कामात ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ असाच प्रकार असल्याची टिप्पणी पालकमंत्र्यांनी केली. (प्रतिनिधी) अन् येळगावकरांची एंट्री झाली नियोजन भवनात सुरू असलेली बैठक मध्यावर आली होती. अन् त्याचवेळी नियोजन भवनाच्या बाहेर गोंधळाचा आवाज येऊ लागला. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार या इमारतीचे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. गोंधळ जास्तच वाढल्याने डोअर किपरने दार उघडले तर येळगावकर तडक आत शिरले. त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्तेही होते. पालकमंत्र्यांचा सत्कार करून ते निघूनही गेले. मेडिकल कॉलेजचा विषय मार्गी लावणार शहरात मेडिकल कॉलेज व पाचशे बेडचे हॉस्पिटल तयार करण्याची गरज असून, तसा प्रस्ताव शासन दरबारी पाठविल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाचे गांभीर्य पालकमंत्र्यांसमोर मांडले. त्यावर या विषयात लक्ष घालून तो मार्गी लावू, असेही पालकमंत्री म्हणाले. खंबाटकीतले तीव्र वळण काढणार पुणे-बेंगलोर महामार्गावर खंबाटकी येथे बोगद्याच्या पुढे असणारे तीव्र वळण काढून टाकणे गरजेचे आहे. हे काम लवकरच केले जाईल. तसेच खंबाटकी घाटात वाहनांची कोंडी होत असल्याने नवीन बोगदा तयार करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची सुगी पंधरा वर्षांच्या वनवासानंतर भाजप-शिवसेनेचे शासन सत्तेवर आलेले आहे. मधल्या काळात दुर्लक्षेचे दुखणे सोसणारे कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या बैठकीला हजर राहिले होते. काही जण तर थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कानात काही सूचनाही करताना पाहायला मिळाले. जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार व महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनीही काही मुद्दे बैठकीत उपस्थित केले. बावळेकर तर पालकमंत्र्यांच्या वाहनात बसून गेले. नियोजन भवनात बैठक असल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेहमी दिसायचे. हे चित्र आज बदलल्याचे दिसले. शासकीय रुग्णालयांची विश्वासार्हता वाढवा शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. या रुग्णालयांची विश्वासार्हता वाढविल्यास गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल. त्यामुळे सिझरसह सर्व उपाययोजना ग्रामीण रुग्णालयातही झाल्या पाहिजेत. येत्या १२ फेब्रुवारीला शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीची संख्या वाढायला पाहिजे. मी यावेळी स्वत: जिल्ह्यातील रुग्णालयांना भेटी देणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले. रखडलेल्या प्रकल्पांसाठी तीन दिवस जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. स्थानिक आमदारांनाही सोबत घेणार आहे. जिहे-कठापूरला २६ जानेवारी रोजी तर वसना-वांगना व इतर प्रकल्पांना त्यानंतरच्या दोन दिवसांत भेट देऊन पाहणी करून निर्णय घेणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.