शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
3
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
4
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
5
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
6
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
7
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
8
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
9
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
10
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
11
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
12
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
13
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
14
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
15
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
16
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
17
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
18
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
19
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
20
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टरच्या मूर्तींना अटकाव करा

By admin | Updated: July 4, 2014 23:48 IST

शिवसेनेची मागणी : राजस्थानी कलावंतांना शाडूमूर्ती बनविण्याची विनंती


सातारा : तलाव, नद्या, विहिरींचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरात येणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना प्रशासनाने अटकाव करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भातील निवेदन सादर केले. महामार्गाजवळ प्लास्टरच्या मूर्तींची विक्री करणाऱ्या राजस्थानी मूर्तिकारांशी चर्चा करून शाडूमातीच्या मूर्ती तयार कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली.
शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर पंडित, माजी उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, उपतालुकाप्रमुख आतिश ननावरे, रमेश बोराटे, प्रवीण शहाणे, निमिष शहा, श्रीनिवास जाधव, हरिदास मोरे, ज्ञानेश्वर साबळे, शेखर कदम, गोपीनाथ यादव, हेमंत उबाळे, नंदकुमार केसरकर, बाळासाहेब शिंदे आदी कार्यकर्त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांची गुरुवारी सकाळी भेट घेतली. ‘शाडूची मूर्ती महाग असल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच रंगकामासाठी घातक रसायने वापरली जातात. त्यामुळे जलप्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. प्लास्टरच्या मूर्ती तळ्यांमध्ये विसर्जित करण्यास बंदी घालण्याचे ठरविण्यात आले आहे. शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे,’ असे या निवेदनात म्हटले आहे.
‘सातारच्या बाँबे रेस्टॉरंट चौकात राजस्थानी मूर्तिकार दरवर्षी प्लास्टरच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणावर विक्री करतात. या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना प्लास्टरच्या मूर्ती न बनविण्याबद्दल विनंती करणार आहोत. प्रशासनानेही याकामी पुढाकार घ्यावा आणि अशा मूर्तींच्या खरेदी-विक्रीला प्रतिबंधासाठी कायदेशीर व प्रबोधनात्मक पावले उचलावीत,’ अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन दिल्यानंतर कार्यकर्ते कृष्णानगर परिसरातील राजस्थानी मूर्तिकारांच्या वस्तीत गेले. यावर्षी शाडूमातीच्याच मूर्ती कराव्यात, असा आग्रह धरला. परंतु, ‘आमच्या मूर्तींचे प्लास्टर वेगळे असून, ते पाण्यात विरघळते,’ असे म्हणत मूर्तिकारांनी यंदाच्या वर्षी अशा मूर्ती करू देण्याची विनंती केली. ‘नियमच केला, तर पुढील वर्षापासून आम्ही मातीच्या मूर्ती करू,’ असे सांगतानाच मातीच्या मूर्ती तयार करण्याइतका वेळ आता शिल्लक नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्यकर्त्यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींना विरोध कायम
ठेवला. ‘नियमच होणार असेल, तर आम्ही पुढील वर्षी मातीच्याच मूर्ती करू,’ असे मूर्तिकारांनी ‘लोकमत’ला सांगितले. (लोकमत टीम)