शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात पोलिसांसाठी गृहप्रकल्प उभारणार

By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडला ‘खाकी’च्या हाती घराची ‘चावी’

कऱ्हाड : ‘पोलिसांना सन्मानाने राहता यावे, त्यांच्या कुटुंबीयांचा विकास व्हावा, यासाठी त्यांच्या घरचे वातावरण चांगले पाहिजे. त्यासाठी कऱ्हाडप्रमाणेच राज्यातील पोलिसांना चांगली घरे देण्याचा आमचा मानस आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कऱ्हाड येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळातर्फे बांधलेल्या १३७ सदनिकांचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, पोलीस महासंचालक अरूण पटनाईक, विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हाधिकारी रामास्वामी एन. उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘महाराष्ट्र पोलीस दलाने कायदा, सुव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळल्यानेच राज्याची समृद्धी होण्यास हातभार लागत आहे. कायदा, सुव्यवस्थेसाठी धडपडणाऱ्या पोलिसांना हक्काचं, कामापासून जवळ घर असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. असे प्रकल्प राबविताना जागा व निधीची अडचण येते, मात्र त्यावर मार्ग काढले जातील. साताऱ्यातील पोलीस वसाहतीचे रूपही लवकरच पालटेल.’ मंत्री पाटील म्हणाले, ‘कऱ्हाडच्या पोलीस सदनिकांचे उद्घाटन करताना समाधान वाटत आहे. त्याचबरोबर राज्यात ८८ हजार पोलीस जवानांचा प्रश्न मार्गी लावायची जबाबदारी आपल्यावर आहे. याची जाणीव तीव्रतेने होत आहे. कऱ्हाडचे पोलीस आता कोंबडीच्या खुराड्यातून बाहेर आलेत, याचा आनंद होत आहे. राज्यात पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच गरिबांची मुले गुणवत्तेच्या जोरावर पोलीस दलात नोकरी करू लागली आहेत. भरती प्रक्रियेत पाच किमी धावताना चार मुलांचा अंत झाला. त्यामुळे यापुढे हे अंतर कमी करू. तरूणांची शारीरिक क्षमता पोलीस दलात आल्यावर वाढविली जाईल.’ मंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘पोलिसांची वसाहत म्हटलं की वेगळं चित्र डोळ्यासमोर येते. कऱ्हाडच्या सदनिकांनी त्याला छेद दिला आहे. यंदा नव्या घरात त्यांची दिवाळी साजरी होईल.’ अरूण पटनाईक यांचेही यावेळी भाषण झाले. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी आभार मानले. यावेळी पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)