शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

VIDEO : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 1:43 AM

गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आली असता. गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी महामार्गाच्या कडेला लावली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले होते.

सातारा : कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. ही घटना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही.

 कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली कोल्हापूर-अर्नाळा (एमएच ०९ एफएल ०९९८३) ही शयनयान एसटी रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आली. येथून काही वेळ थांबा घेऊन ही गाडी साडेनऊच्या सुमारास पुण्याच्या दिशेने रवाना झाली. गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आली असता. गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी महामार्गाच्या कडेला लावली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे गाडीतील सर्व प्रवाशांना सुरक्षित अंतरावर वेळेत पोहोचता आले. त्यानंतर काही क्षणात गाडीने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाठविण्यात आले.

प्रवाशांना आणण्यासाठी पर्यायी गाडी -गाडीतून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामुळे कसलीही जीवित हानी झाली नाही. यानंतर एसटी चालक-वाहकांनी सातारा मध्यवर्ती बसस्थानकात संपर्क साधून आगीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सातारा आगारातील कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप पुन्हा सातारा बसस्थानकात आणण्यासाठी पर्यायी गाडीची व्यवस्था केली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFire Brigadeअग्निशमन दलBus Driverबसचालकfireआग