आॅनलाईन लोकमतपाचवड : मध्यपी नवºयाला पत्नीने डोक्यात फरशी व वरवंटा घालून संपवले. खुनानंतर नवºयाला रात्रभर दारात रक्ताच्या थारोळ्यात सोडून ती घरात झोपली. ग्रामस्थांनी सकाळी त्याला पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर भुर्इंज पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती सांगितली. संजय विष्णू कांबळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भुर्इंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय विष्णू कांबळे (वय ४५, मूळ गाव वाकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली) हा सासरवाडी आनेवाडी येथे पत्नी सुलोचना, तीन मुली व मुलासह राहतो. संजय कांबळे हा सोमवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान पिऊन आल्यामुळे नवरा-बायकोत वादावादी झाली. यातूनच पत्नी सुलोचना हिने संजय याच्या डोक्यात फरशी व वरवंटा घालून खून केला. त्याला त्याच अवस्थेत रात्रभर घराबाहेर ठेवून ती घरात झोपली. सकाळी उठल्यावर ‘मध्यपी नवरा पाय घसरून पडला,’ असा बनाव केला. यादरम्यान इतर लोकांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्याम बुवा, कॉन्स्टेबल जितू शिंदे, सचिन ससाणे यांनी भेट देऊन चौकशी केली असता खुनाचा प्रकार समोर आला.वाईचे उपविभागीय पोलीस अधीक्षक अजित टिके यांनी मृत संजयच्या तीन मुली व चिमुरड्या मुलाकडे चौकशी केली असता ‘दारूमुळे रोजच भांडणे होत होती,’ असे सांगण्यात आले. त्यानंतर दारूच्या त्रासाला कंटाळून पत्नी सुलोचना हिने खून केला, असे समजले. या घटनेची भुर्इंज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, महिला पोलीस निरीक्षक रजपूत तपास करीत आहेत.
फरशी अन् वरवंटा डोक्यात घालून मद्यपी पतीचा खून : आनेवाडीत थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 16:24 IST
आॅनलाईन लोकमत पाचवड : मध्यपी नवºयाला पत्नीने डोक्यात फरशी व वरवंटा घालून संपवले. खुनानंतर नवºयाला रात्रभर दारात रक्ताच्या थारोळ्यात ...
फरशी अन् वरवंटा डोक्यात घालून मद्यपी पतीचा खून : आनेवाडीत थरार
ठळक मुद्देनवरा रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात ‘ती’ घरात झोपली