शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मल्लखांबाच्या प्रचारासाठी ५५ वर्षे खर्ची ; सुभाष यादव यांनी घडविले शेकडो खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 7:25 PM

सेवानिवृत्तीनंतरही मल्लखांब प्रशिक्षण व योग प्राणायम प्रशिक्षण देण्याचे काम शाळा-शाळांमधून, गावागावातून सुरूच आहे़ त्यामुळे शेकडो मल्लखांबपटू जिल्हा वि राज्याचे नाव कमावत आहेत.

वाई : आज वाई परिसरातील शेकडो मल्लखांबपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करीत आहेत. त्याचे श्रेय निवृत्त शिक्षक सुभाष यादव यांना जाते. त्यासाठी त्यांनी अव्याहतपणे ५५ वर्षे कष्ट केले. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी मल्लखांब या महाराष्ट्राच्या मातीतील खेळाची जडलेली आवड जपली. या खेळाच्या प्रचार आणि प्रचारासाठी जिवाचे रान करून हजारो विद्यार्थ्यांना हा खेळ शिकवला.

मल्लखांब खेळासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना वेगवेगळे बहुमान मिळले आहेत. प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांना या खेळाची आवड लागली. पुढे महाविद्यालयात असताना भिडे गुरुजी व्यायाम शाळेत त्यांनी जायला सुुरुवात केली़ दरम्यानच्या काळात १९६९ मध्ये औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवात तत्कालीन क्रीडामंत्री शेषराव वानखेडे यांच्याहस्ते रौप्यपदक मिळाले. त्यानंतर महाविद्यालयीन, विद्यापीठ आणि राज्यस्तरावर उल्लेखनीय काम करीत विविध पदके पटकावली.

दरम्यान, १९७४ मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी पत्कारली. त्यावेळी त्यांनी सातारा तालुक्यातील कारी, लावंघर, करंजे, करडी, कण्हेर, आकले, लिंब गोवे तसेच बसप्पाची वाडी येथे मल्लखांबाचा प्रचार केला पुढे वाई तालुक्यात बदली झाल्यावर वाईच्या पागा तालीम तसेच किसनवीर महाविद्यालयात टीम तयार केली .

खानापूर, परखंदी, धावडी, अभेपुरी, रेनावळे, जांभळी, अनवडी, (जोशी विहीर), भुर्इंज, जांब, किकली या गावांमध्ये मल्लखांबांचा प्रचार करून हजारो खेळाडू तयार केले. या कार्याची पावती म्हणून सातारा जिल्हा परिषदेने १९८४ मध्ये ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविले. पुढे असेच कार्य चालू ठेवल्याने त्यांना विविध पुरस्करांने गौरविण्यात आले. सेवानिवृत्तीनंतरही मल्लखांब प्रशिक्षण व योग प्राणायम प्रशिक्षण देण्याचे काम शाळा-शाळांमधून, गावागावातून सुरूच आहे़ त्यामुळे शेकडो मल्लखांबपटू जिल्हा वि राज्याचे नाव कमावत आहेत.

सुभाष यादव यांनी अभेपुरी येथील प्राथमिक शाळेत असताना मल्लखांब शिकविला, पुढे जाऊन मी राज्य, राष्ट्रीय पातळीवरील अनेक पारितोषिके मिळविली. अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शिकवत असताना माझ्या हातून ही अनेक यशस्वी विद्यार्थी घडले आहे, याचे सर्वस्वी श्रेय यादव गुरुजींना जाते़- विठ्ठल गोळआतंरराष्ट्रीय प्रशिक्षक व सचिव जिल्हा मल्लखांब असोशिएशन

आपली कला ही समाजासाठी वापरावी त्याचा प्रसार करावा़ हेतू ठेवून आजही कार्यरत आहे़ यातूनच शेकडो राज्य, राष्ट्रीय मल्लखांबपटू तयार झाले. याचा मनस्वी आनंद असून, ग्रामीण भागातही खेळाडू घडत आहेत़ हीच माझी आजवरची खरी कमाई आहे़-सुभाष यादव, मल्लखांब प्रशिक्षक 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeacherशिक्षक