शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

एकांकिता, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन... रश्मी साळवीचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 6:30 PM

नाटक, चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम करत असताना घरातूनही तेवढीच मोकळीक मिळणे आवश्यक असते. यामध्ये आई-वडिलांकडून चांगले प्रोत्साहन मिळाले. तर भाऊ राहुलचेही चांगले सहकार्य लाभत गेले. - रश्मी साळवी, अभिनेत्री

ठळक मुद्देसातारा, पुण्यात चित्रीकरण केले जात आहे.

सातारा : साताऱ्याच्या भूमीतून असंख्य कलाकार घडले आहेत. ते आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत. पण रश्मी साळवी या मात्र अपवाद ठरत आहेत. त्या सध्या एकाच वेळी नाटक, वेब सिनेमा अन् चित्रपट क्षेत्रात काम करत आहेत. हे करत असताना ‘टॉयलेट स्टोरी’ चित्रपटात भूमिका, कार्यकारी निर्माती, सौजन्य दिग्दर्शक अन् कास्टिंग डायरेटर म्हणून त्या विविध जबाबदा-या पार पाडत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या रश्मी साळवी यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : आपण या क्षेत्रात कसा प्रवेश केला?उत्तर : माझे शिक्षण वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंत झाले आहे. हे करत असताना मला वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घेण्याची आवड निर्माण झाली. त्यातून स्टेज डेअरिंग आले. मीडियात काम करण्याचे स्वप्न होते. त्यानंतर एकांकिकांमध्ये काम करू लागले अन् हळूहळू नाटक, चित्रपटातही काम करू लागले.

प्रश्न : नाटकांविषयी आपला अनुभव कसा आहे?उत्तर : ‘गोची झाली ना, लवंगी मिरची कोल्हापूरची’ या नाटकातून २०१३ मध्ये नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. या नाटकांतील भूमिकांना रसिकांनी उचलून धरल्याने एकापाठोपाठ एका नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळत गेली. अन् ती तितक्याच ताकतीने निभावलीही. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये नाटकांचे प्रयोग झाले आहेत. ‘गावकथा’ नाटकात लहान मुलगी, तरुणी, प्रौढ महिला अन् आजीबाईची अशा भूमिका साकारल्या आहेत.

प्रश्न : महिला म्हणून काम करताना कसा अनुभव येतो?उत्तर : नाटक, चित्रपट क्षेत्र विचित्र आहे, असा गैरसमज आहे. नाटकांच्या दौºयाच्या निमित्ताने बाहेर प्रवास करावा लागतो; पण मला सर्वच बाबतीत चांगला अनुभव आला. आपण कसे वागतो यावर समोरचे वागत असतात. त्यामुळे महिला म्हणून एक वेगळी वागणूक न मिळता कलाकार म्हणून मिळत गेली.

‘टॉयलेट स्टोरी’त लागणार कसएखाद्या चित्रपटात काम करणं वेगळं; पण ‘टॉयलेट स्टोरी’मध्ये विविध भूमिका पार पाडाव्या लागत आहेत. यामध्ये त्यांच्याकडे एक महत्त्वाची भूमिका आहेच. त्याचबरोबर कार्यकारी निर्माती, सौजन्य दिग्दर्शक अन् कास्टिंग डायरेस्टर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. यासाठी सातारा, पुण्यात चित्रीकरण केले जात आहे.

नाटकात भूमिकासौजन्याची ऐशी तैशी, नाथ हा माझा, यंदा कर्तव्य आहे, गोची झाली ना, लवंगी मिरची कोल्हापूरची, विच्छा माझी पुरी करा, गर्जले सह्याद्रीचे कडे, द आय व्हिटनेस, गावकथा, घरटे जिव्हाळ्याचे (दिग्दर्शन), एका शेवटाची सुरुवात (लेखन आणि दिग्दर्शन) केले आहे.

टॅग्स :cinemaसिनेमाSatara areaसातारा परिसरPuneपुणे