शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या सहा पदरीकरणास ‘बीओटी’वर लवकरच सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहापदरीकरण कामाची प्रक्रिया तात्काळ सुरू करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहापदरीकरण कामाची प्रक्रिया तात्काळ सुरू करून ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर काम सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी दिल्या. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील रस्ते विकासाच्या कामांच्या मागणीचे निवेदन गडकरी यांना दिले. त्यानंतर गडकरी यांनी शेंद्रे-कागल महामार्गाच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निविदा काढण्याच्या सूचनाही दिल्या. याप्रसंगी उदयनराजे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राजमुद्रा भेट दिली.

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण आणि पुणे ते सातारा या दरम्यानच्या महामार्गाच्या रखडलेल्या विविध कामांबाबत उदयनराजे यांनी भेट घेतली. या भेटीत सातारा जिल्ह्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम कसे होईल तसेच जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि महामार्गाला जोडणारे जिल्ह्यांतर्गत रस्ते मजबूत करून पायाभूत सुविधा वाढवण्यावर आपला भर आहे. त्यासाठी केंद्राच्या माध्यमातून आवश्यक तो निधी मिळवण्याबाबत गडकरी यांच्याशी चर्चा केल्याचे खासदार उदयनराजे यांनी सांगितले.

दरम्यान, शेंद्रे ते कागल महामार्गावर कराड शहरातील वाहतुकीची कोंडी आणि होणारे अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या मार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्‍यावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी उदयनराजे यांनी केली. या पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. उदयनराजे यांनी पुणे ते शेंद्रे राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे आणि रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच खंडाळा बोगद्याच्या कामाबाबत चर्चा केली.

याशिवाय कऱ्हाड ग्रामीण भागातून शहराच्या दिशेने येणारे रस्ते कऱ्हाड शहराभोवती रिंग रोडच्या माध्यमांतून जोडण्याचा प्रस्ताव असून, हा रस्ता तासवडे-शहापूर-अंतवडी-कार्वे-वडगाव-हवेली-कोडोली-पाचवड फाटा असा आहे. यामुळे कऱ्हाड शहराच्या पूर्वभागाला जोडणार हा रिंगरोड असेल, तर साकुर्डी-येणके-येरावळे-विंग-धोडेवाडी फाटा ते पाचवड हा पश्चिम भागाला जोडणारा रिंग रोड असेल. तर पाटण तालुक्यांतील डिचोली कोयनानगर-हेळवाक-मोरगिरी-म्हारूल हवेली-विंग-वाठार-रेठरे-शेणोली स्टेशन या राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव असून, त्याबाबत चर्चा झाली.

फोटो ओळ : दिल्ली येथे बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

फोटो नेम : १०उदयनराजे