शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच निवडीवरून शेणोलीत धुमश्चक्री!

By admin | Updated: August 28, 2015 00:04 IST

गावात तणाव : माजी सरपंचासह तिघे गंभीर; पोलीस बंदोबस्त तैनात

कऱ्हाड/शेणोली : शेणोली (ता. कऱ्हाड) येथे सरपंच, उपसरपंच निवडीच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादावादीचे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मारामारीत पर्यवसान झाले. दोन राजकीय गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी सरपंचासह तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड सुरू होती. काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच काहीजण पसार झाले आहेत. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेणोली ग्रामपंचायतीची निवडणूक ४ आॅगस्टला पार पडली आहे. बुधवारी तेथील सरपंच, उपसरपंच निवडीही पार पडल्या. यावेळी माजी सरपंच नारायण शिंगाडे यांच्या गटातील सरपंच व्हावा, अशी शिंगाडे गटाची अपेक्षा होती. मात्र, विरोधी गटातील महिलेला सरपंचपद मिळाले. त्यामुळे बुधवारपासून गावात तणावपूर्ण वातावरण होते. अशातच गुरुवारी सकाळी सरपंच, उपसरपंच निवडीच्या कारणावरून नारायण शिंगाडे यांचा विरोधी गटातील काही कार्यकर्त्यांशी वाद झाला. त्यावेळी शिंगाडे गटातील काहीजणांनी विरोधी गटातील एकास मारहाण केली. त्याला ग्रामस्थांनी उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीनंतर विरोधी गटातील काहीजण आक्रमक झाले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नारायण शिंगाडे हे गावातील मुख्य बाजारपेठेत आले असताना विरोधी गटातील काहीजणांनी त्यांना घेरले. सकाळी केलेल्या माराहाणीचा जाब विचारत त्यांनी शिंगाडे यांना धक्काबुक्की केली. यावेळी शिंगाडे गटातील काहीजण त्याठिकाणी पोहोचले. त्यामुळे हा वाद वाढत गेला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. विरोधी गटातील काहींनी नारायण शिंगाडे यांच्यासह त्यांचा पुतण्या सतीश शिंगाडे व अन्य एकास बेदम मारहाण केली. मारहाणीत ते तिघे गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती. (वार्ताहर)मैत्रीपर्वातील बिघाडी ठरली ठिणगीशेणोलीमध्ये ४ आॅगस्टला निवडणूक पार पडली. त्यामध्ये अतुल भोसले समर्थक नारायण शिंगाडे व उंडाळकर समर्थकांनी एकत्रितपणे आठ जागा मिळवून विजय संपादन केला. मात्र, बुधवारी प्रत्यक्षात सरपंच निवडीवेळी उंडाळकर समर्थक तीन सदस्य पृथ्वीराज चव्हाण, मदनराव मोहिते यांच्या गटाच्या बरोबर राहिले. त्यांनी सरपंच, उपसरपंच निवडीत बाजी मारली. याच कारणावरून हा वाद पेटल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. गुरुवारी दुपारी मदनराव मोहिते समर्थक कार्यकर्त्याला शिंगाडे गटातील काहीनी मारहाण केली. त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या मोहिते समर्थकांनी शिंगाडे यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.