शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाडळी ग्रामपंचायतीस चंदेरी प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST

मसूर : दूषित पिण्याच्या पाण्यामुळे अनेकदा साथीचे आजार पसरल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे अनेकजण साथीचे बळी ठरत असतात; मात्र ...

मसूर : दूषित पिण्याच्या पाण्यामुळे अनेकदा साथीचे आजार पसरल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे अनेकजण साथीचे बळी ठरत असतात; मात्र कऱ्हाड तालुक्यातील उत्तरेकडील टोकावर असलेल्या पाडळी गावाने सलग पाच वर्षे पाणीपुरवठ्यासाठीचे हिरवे कार्ड मिळवले आहे. जिल्हा परिषदेमार्फत नुकतेच या ग्रामपंचायतीला चंदेरी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे पाडळी ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

कऱ्हाड तालुक्याच्या उत्तरेकडील टोक असणारे पाडळी हे गाव आहे. या गावाला पाणी टंचाईच्या झळा नेहमीच बसत असत. त्यामुळे पाण्याचे महत्त्व संपूर्ण गावाने ओळखले आहे. या ग्रामपंचायतीने २०१६ ते २०२० अखेर सलग पाच वर्षे गावात कोणत्याही साथीच्या आजारांचा प्रसार होऊ दिला नाही. यासाठी विशेष प्रयत्न केले होते. स्वच्छ, शुद्ध आणि योग्यप्रमाणात पाण्यात मिसळावयाच्या घटकांचा वापर केला होता. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदअंतर्गत पिण्याच्या पाणी स्त्रोत स्वच्छता सर्वेक्षणअंतर्गत सलग पाच वर्षे ग्रामपंचायतीस हिरवे कार्ड मिळाले आहे. खरंतर पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यात महत्त्वाची भूमिका असते. ती भूमिका पाडळी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव मारुती कुंभार यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व्यवस्थित पार पाडली. ग्रामपंचायतीनेही नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सरपंच सुरेखा जाधव, उपसरपंच सुहास जाधव, ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव, पुष्पा जाधव, विद्या शिंदे, ग्रामसेवक जे. एस. ढाणे यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव कुंभार यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.

०७मसूर-पाडणी

पाडळी (ता. कऱ्हाड) येथे पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा जाधव, उपसरपंच सुहास जाधव उपस्थित होते. (छाया : जगन्नाथ कुंभार)