शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्कीच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:41 IST

मायणी : हिवरवाडी (ता. खटाव) येथील देशमुख मळ्यातील अजित देशमुख यांच्या अडीच एकर क्षेत्रातील आंबा बागेला पवनचक्कीच्या डीपीत झालेल्या ...

मायणी : हिवरवाडी (ता. खटाव) येथील देशमुख मळ्यातील अजित देशमुख यांच्या अडीच एकर क्षेत्रातील आंबा बागेला पवनचक्कीच्या डीपीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे साठ आंब्याची झाडे जळाली. त्यामुळे सुमारेे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत आंबा बागायतदार हिंदुराव जगताप यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती की, सन २००५ मध्ये आमचा मुलगा अजित जगताप याने सुमारे अडीच एकर क्षेत्रामध्ये केशर, हापूस व बदाम अशा विविध जातीच्या आंब्याची सुमारे १५० झाडांची लागण केली होती. सुमारे पंधरा वर्षांपूर्वीची ही आंब्याची झाडे असून, गतवर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व सर्वत्र लाॅकडाऊन असतानाही आम्हाला आठ ते दहा लाख रुपये या आंब्याच्या झाडापासून उत्पन्न मिळाले होते. पुढील महिन्यांमध्ये हा आंबा विक्री योग्य होणार होता, त्यातच परवा शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येथील बागेच्या वरील बाजूस असलेल्या पवनचक्कीच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण डीपी जळाला, तसेच डीपी जळत असताना डीपीशेजारील वाळलेल्या गवताने पडून गवताने पेट घेतला व मोठ्या प्रमाणात आग लागल्याने ती आग बागेच्या दिशेने आली आणि बागेतील गवताने पेट घेतला.

बागेतील झाडांना आग लागल्याचे पाहून त्यांनी आरडाओरडा केला व आसपासच्या लोकांना बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, केशर, बदाम, हापूस आंब्याची बागेतील साठ झाडे जळून खाक झाली आहेत, तर आंब्याची ९० झाडे वाचविण्यात यश आले. जळीत झाडांची कृषी अधिकारी एस.व्ही. जगताप, तलाठी जी. एन. पिसे, सरपंच सविता जगदाळे, पोलीस पाटील ज्योती माने, किरण देशमुख व कार्यालयातील अधिकारी यांनी पंचनामा केला असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

(चौकट)

नुकसान भरपाईची मागणी

२००५ पासून अतिशय कष्टाने आंब्याची बाग उभा केली आहे. दुष्काळात प्रत्येक वेळी विकत पाणी घेऊन ती आंब्याची बाग जगविण्यासाठी आम्ही धडपड केली. बागेतील साठ झाडे जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी.

- जयहिंद जगताप, आंबा बागायतदार, हिवरवाडी.

०६मायणी

हिवरवाडी येथील जळालेल्या आंब्याच्या बागेचा पंचनामा करताना कृषी अधिकारी एस.व्ही. जगताप, तलाठी, सरपंच,पोलीस पाटील उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)