शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातील कामगारांना कळकाने चोपले

By admin | Updated: April 5, 2015 00:01 IST

चुलता-पुतण्याला अटक : चोरीच्या संशयावरून मायणी येथे घडला प्रकार

मायणी : चोरी केल्याच्या संशयावरून स्वत:च्याच दुकानातील कामगारांना चुलता आणि पुतण्याने मिळून जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना मायणी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दुकानमालकासह पुतण्याला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मायणी येथे मधुकर निवृत्ती घाडगे (रा. निमसोड, ता. खटाव) यांचे रेवणसिद्ध क्लॉथ स्टोअर्स नावाचे कापड विक्रीचे दुकान आहे. त्यांच्याच दुकानात मायणी येथील हणमंत दिनकर काटकर (वय २२) व अमित राजाराम सोमदे (वय १९) हे कामगार म्हणून कामास होते. घटना घडली त्यादिवशी दुपारी कचऱ्याच्या डब्यात दुकान मालक मधुकर घाडगे यांना दोन साड्या सापडल्या. या साड्या चोरून नेण्याच्या उद्देशाने कामगारांनी डब्यात टाकल्या असाव्यात, असा संशय घेऊन मधुकर घाडगे व त्यांचा पुतण्या सुशांत मुरलीधर घाडगे या दोघांनी दुकानाचे शटर बंद करून कामगारांना माडीवर नेऊन कळकाने मारहाण केली. मारहाण थांबल्यानंतर ते दोघेही जखमी अवस्थेत घरी गेले. तातडीने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर या घटनेची नोंद मायणी पोलीस ठाण्यात केली. (वार्ताहर)