Satara: क्षेत्रमाहुली वाहनावर वारंवार हल्ल्याचे नाट्य उघड; ..म्हणून रचल कुभांड, शिक्षक ठरला मास्टरमाईंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:30 IST2026-03-06T15:28:14+5:302026-03-06T15:30:56+5:30

वाहनावर पेट्रोल टाकून ते जाळण्याचाही प्रयत्न

Shocking revelation of frequent incidents of breaking vehicle windows and attempts to burn vehicles in Mahuli area satara | Satara: क्षेत्रमाहुली वाहनावर वारंवार हल्ल्याचे नाट्य उघड; ..म्हणून रचल कुभांड, शिक्षक ठरला मास्टरमाईंड

Satara: क्षेत्रमाहुली वाहनावर वारंवार हल्ल्याचे नाट्य उघड; ..म्हणून रचल कुभांड, शिक्षक ठरला मास्टरमाईंड

सातारा : क्षेत्र माहुली, सातारा येथे गेल्या दोन वर्षांपासून एका चारचाकी वाहनाची काच फोडणे तसेच वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांचा धक्कादायक खुलासा सातारा शहर पोलिसांच्या डी. बी. पथकाने केला आहे. या प्रकरणात तक्रार देणारेच शिक्षक या गुन्ह्याचे सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले.

क्षेत्र माहुली परिसरातील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षक आण्णा शिवाजी पवार (वय ५९) यांनी गेल्या दोन वर्षांत त्यांच्या चारचाकी वाहनाची काच फोडणे आणि वाहन जाळण्याचा प्रयत्न झाल्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात २०२४, २०२५ आणि २०२६ या कालावधीत एकूण सहा गुन्हे दाखल केले होते. अज्ञात व्यक्ती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चेहरा लपवून वाहनावर दगड मारून काचा फोडत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. एका घटनेत वाहनावर पेट्रोल टाकून ते जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

दरम्यान, पवार यांचे शेजाऱ्यांशी जागेच्या वादावरून मतभेद असल्याने त्यांनी तक्रारीत त्यांच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी संबंधित व्यक्तींची चौकशी केली, मात्र कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे प्रकरण गुंतागुंतीचे बनले होते. यामुळे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी डी.बी. पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरवळ येथील सटवाई कॉलनीतील आकाश संजय इंगवले (वय २८) या युवकाला ताब्यात घेतले. चौकशीत सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली; मात्र कौशल्यपूर्ण चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तो तक्रारदार पवार यांचा मानलेल्या बहिणीचा मुलगा असल्याचे समोर आले. पवार यांच्या सांगण्यावरूनच तो खंडाळा येथून रात्री येऊन वाहनाची तोडफोड करत असल्याचे त्याने कबूल केले.

डीबी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार नीलेश यादव, सुजीत भोसले, नीलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

त्यांनी जागा सोडावी म्हणून रचल कुभांड!

शेजाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास व्हावा आणि त्यांनी जागा सोडावी, या हेतूने हे कृत्य करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. तसेच संबंधित शिक्षक यांनी वाहनाच्या नुकसानीबाबत फायनान्स कंपनीकडून नुकसानभरपाई घेतल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात फिर्यादी आण्णा पवार यांचाही सहभाग आढळून आल्याने त्यांना सहआरोपी करण्यात आले असून पुढील तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

Web Title : सतारा: पड़ोसी को निकालने के लिए शिक्षक ने रची वाहन हमले की साजिश

Web Summary : सतारा में, एक सेवानिवृत्त शिक्षक ने पड़ोसियों को फंसाने और बीमा का दावा करने के लिए अपने ही वाहन पर हमले करवाए। वह भूमि विवाद के कारण उन्हें संपत्ति खाली करने के लिए मजबूर करना चाहता था। पुलिस जांच में पता चला कि उसका भतीजा शामिल था। दोनों अब सह-आरोपी हैं।

Web Title : Satara: Teacher Mastermind Behind Vehicle Attacks to Evict Neighbors

Web Summary : In Satara, a retired teacher orchestrated attacks on his own vehicle to frame neighbors and claim insurance. He wanted to force them to vacate their property due to a land dispute. Police investigations revealed his nephew was involved. Both are now co-accused.