शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिवमूर्तीच्या साक्षीनं उजळला अजिंक्यतारा!

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

किल्ल्यावर दीपोत्सव : तरुण सातारकरांनी तटबंदीवर केल्या शंभर मशाली अन् दोनशे पणत्या प्रज्वलित

सातारा : साताऱ्याला वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहासाच्या अनेक खुणा शहर परिसरात आजही दिसतात. ज्या पाहताक्षणी ऊर अभिमानानं भरून येतो. शौर्याची साक्ष देत शेकडो वर्षे भक्कमपणे उभा असलेला अजिंक्यतारा किल्ला तर साताऱ्याचं भूषण आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनित झालेला हा किल्ला सोमवारी रात्री तरुण सातारकरांच्या दीपोत्सवानं उजळून गेला. निर्मिती सोशल ग्रुपच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून तुळशी विवाहाच्या पहिल्या दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे नियोजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. सोमवारी सकाळी अकरा वाजता गु्रपच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर या सोहळ्यासाठी प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सायंकाळी मशाल आणि पणत्या प्रज्वलित करण्याची तयारी पूर्ण झाली; एवढ्यात पाऊस सुरू झाला. मात्र, नाउमेद न होता कार्यकर्त्यांनी प्रवेशव्दाराजवळील जोत्यात आसरा घेऊन मशाली पेटविण्यास सुरूवात केली. या मशालींच्या लखलखत्या प्रकाशात उजळून गेलेल्या शिवमूर्तीचे दर्शन घेताना सारेच कायकर्ते भारावून गेले.यंदा ग्रुपने प्लास्टिक हटाव मोहिमेतही सक्रिय सहभाग घेतला असून स्वच्छता मोहीम तसेच दीपोत्सवासाठी जमलेल्या लोकांना गु्रपच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष इम्रान मोमीन, उपाध्यक्ष राहुल आग्रवाल यांच्यासह जवळपास शंभर कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये सुशिक्षित आणि नोकरदार मंडळींचाही मोठा सहभाग आहे. अमित काळे आणि अमर बनसोडे मित्र समूहाचेही यासाठी सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)शंभर कार्यकर्त्यांचे किल्ल्यावर श्रमदान--निर्मिती सोशल ग्रुपच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी सोमवारी अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान करून साफसफाई केली. यामध्ये सुशिक्षितांबरोबरच नोकरदारांचा सहभाग होता. किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यंदा मोठ्याप्रमाणात सोहळा..गेल्या काही वर्षांपासून तरुण सातारकर एकत्र येऊन साताऱ्याच्या उज्ज्वल इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर होणारा दीपोत्सव त्याचाच भाग आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदा हा दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेऊन शंभर कार्यकर्त्यांनी शंभर मशाली तयार करून त्या किल्ल्यावर पेटविल्या. तर तटबंदीवर दोनशे पणत्याही प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. यासाठी दहा किलो तेल लागले.