शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

श्रीराम विरोधात निवृत्त कामगारांचे शिमगा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 8:31 PM

ग्रॅच्युइटीची रक्कम, थकित पगार किंवा रजेचा पगार असेल तो द्यावा. आमचे कारखाना प्रशासन व नेतेमंडळींशी वैर नाही. आमची चर्चा करण्याची तयारी आहे. परंतु कारखाना प्रशासन व नेतृत्वाची घमेंड असेल तर आमचीही माघार नाही. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा फलटण कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी दिला आहे.

ठळक मुद्देश्रीराम विरोधात निवृत्त कामगारांचे शिमगा आंदोलन होळी पेटविली : नेतृत्वाची घमेंड असेल तर माघार नाही

फलटण : ग्रॅच्युइटीची रक्कम, थकित पगार किंवा रजेचा पगार असेल तो द्यावा. आमचे श्रीराम सहकारी साखर कारखाना प्रशासन व नेतेमंडळींशी वैर नाही. आमची चर्चा करण्याची तयारी आहे. परंतु कारखाना प्रशासन व नेतृत्वाची घमेंड असेल तर आमचीही माघार नाही. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा फलटण कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी दिला आहे.दरम्यान, यावेळी श्रीराम विरोधात होळी पेटवून शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटीची रक्कम व थकित पगार आणि रजेचा कामगारांना पगार मिळावा, यासाठी दिवाळीत फलटण कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली १५० कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. कामगारांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी उपोषणस्थळी, होळी पेटवून श्रीराम कारखाना व्यवस्थापनांच्या नावाने शंखध्वनी करून शिमगा आंदोलन केले. यावेळी अ‍ॅड. नरसिंह निकम बोलत होते.दिवाळीचा पाडवा सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असतो. परंतु पाडव्याला निवृत्त कामगारांना शिमगा आंदोलन करावे लागले आहे. गेले आठ दिवस येथे साखळी उपोषण सुरू आहे. परंतु कारखाना व्यवस्थापन, कामगारांच्या ग्रॅच्युइटीबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे. आम्हाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पाडव्यादिवशी शिमगा आंदोलन करत आहे. कारखाना प्रशासन व नेतृत्वाचा आम्ही निषेध करत आहोत, असेही अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी सांगितले.२०१७ पासून आमच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. रामनगरीत दिवाळीचा सण साजरा होतोय. परंतु आज येथे आम्हाला होळीचा सण साजरा करायला लागत आहे. यासारखे दुर्दैव नाही. प्रशासनाला, आमची एकच विनंती आहे, आमची चर्चेची तयारी आहे. कोणताही प्रश्न चर्चेतून सोडवता येतो, प्रशासनाने आमचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी यावेळी रवींद्र फडतरे यांनी केली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर