Satara: मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नराधमास ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:04 IST2025-06-09T13:03:57+5:302025-06-09T13:04:16+5:30

घरात कोणी नसल्याचे पाहून केला अत्याचार

Seven year old girl raped by aunt husband in satara | Satara: मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नराधमास ठोकल्या बेड्या 

Satara: मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, नराधमास ठोकल्या बेड्या 

सातारा : मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सातारा शहरात घडली असून, या प्रकरणी संबंधित नराधमावर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ जून रोजी घडली.

याबाबत पीडित मुलीच्या आईने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. राहत्या घरात कोणी नसल्याचे पाहून माझ्या सात वर्षांच्या मुलीवर माझ्या दाजीने अत्याचार केला. मुलीने आईला याची माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली.

त्यानंतर, आईने ७ जून रोजी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित नराधमाला बेड्या ठोकल्या. महिला पोलिस उपनिरीक्षक इंगळे या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Seven year old girl raped by aunt husband in satara