शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

वनस्पतींवरून डोंगरकड्यात पाण्याचा शोध!

By admin | Updated: May 25, 2016 00:52 IST

३५ वर्षांत ५ झरे हुडकले : कास पठाराच्या आखाडेवाडीतील आबालवृद्धांनी एकत्र येऊन केली पाणीटंचाईवर मात - लोकमत जलमित्र अभियान

सागर चव्हाण -- पेट्रीकास पठारावर नानाविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. वेगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे लोकांमध्ये त्यांची ओळख असते. विविध आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या औषधी वनस्पती, तसेच विषारी वनस्पती स्थानिक लोक चांगल्या प्रकारे ओळखतात. त्याचा ते वापरही करतात. अशाचप्रकारे डोंगरी वनस्पतींवरून पाण्याचा शोध लावण्यातही कुसुंगी मुरा येथील नागरिकांनी लावला आहे. कास डोंगरमाथ्यावर १५ ते २० उंबऱ्यांची आखाडेवाडी ही छोटी लोकवस्ती आहे. येथील लोकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी डोंगर पालथे घालावे लागतात. ही पायपीट गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासूनच सुरू होता. डोंगरकपारीत ज्याठिकाणी बारी, रेंडागी, कापसी या वनस्पती जेथे असतील ते हमखास पाणी असते, हा येथील लोकांचा पुर्वानुभव असल्याने लोक डोंगरकपारीत फिरून ज्याठिकाणी या वनस्पती असतील, ओलावा असेल, तेथे खुदाई करत. महिनोमहिने श्रमदान केल्यानंतर त्यांना पाण्याचा शोध लागते असे. असे पाच झरे त्यांनी याप्रकारे शोधून काढले आहेत. काळ्याकभिन्न कातळाला फोडला पाझर कास पठारावरील आखाडेवाडीला उन्हाळ्यात तीव्रपाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. खडकाळ जमीन असल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी पाण्यासाठी भटकंती ठरलेली होती. यासाठी गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून येथील रहिवाशांनी डोंगरकपारीत फिरून काळ्याकभिन्न दगड फोडून पाण्याचा शोध लावत आहेत. आजपर्यंत त्यांनी पाच पाण्याचे झरे श्रमदानातून तयार केले आहेत. त्याला पाणीही लागले आहे.