शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी रंगभूमीवर ‘सातारी धाडस’!

By admin | Updated: December 17, 2015 23:02 IST

रविवारी शुभारंभाचा प्रयोग : ‘परफेक्ट मिसमॅच’साठी अपघातानं भेटत गेले ‘परफेक्ट मॅच’

सातारा : व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करताना अनेक कल्पनांना मुरड घालावी लागते म्हणून स्वत:च निर्माता होण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या सातारच्या कलावंताला मुंबईत एकापाठोपाठ एक ‘पॅशनेट’ रंगकर्मी मिळत गेले. सर्वांनी मिळून ‘परफेक्ट मिसमॅच’ या आगळ्या नाटकाची मोट बांधली आणि ही मंडळी शुभारंभाचा प्रयोग सातारच्या शाहू कला मंदिरात येत्या रविवारी (दि. २०) सादर करीत आहेत.सातारचा रंगकर्मी किरण माने मुंबईत अनेक वर्षे काम करतो आहे. मूळचा समांतर रंगभूमीवरचा हा कलावंत असल्यामुळं व्यावसायिक तडजोडी करताना छातीवर धोंडा ठेवावा लागतो, असा त्याचा अनुभव. त्यामुळं स्वत:च निर्माता व्हायचं, असा धाडसी निर्णय त्यानं घेतला; पण ‘परफेक्ट मिसमॅच’ या नाटकाच्या प्रवासात त्याला ‘सहनिर्माता’च व्हावं लागलं. कारण निर्मात्यापासून सहकलावंतांपर्यंत सर्वजण नाटकाच्या वेगळेपणामुळं एकमेकांशी आपोआप बांधले गेले.नाटकाचं लेखन कोल्हापूरच्या हिमांशू स्मार्तचं. वाचन झालं आणि किरण मुंबईत कलावंत, तंत्रज्ञ, सहनिर्मात्यांचा शोध घेऊ लागला. कुणाला ‘नामवाला’ कलावंत हवा, तर कुणाला नाटकात मोठे बदल हवेत. ही कोंडीही साताऱ्यातच फुटणार होती.दिग्दर्शक मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत साताऱ्यात एका प्रयोगासाठी आले असताना किरणने ‘परफेक्ट मिसमॅच’च्या वाचनाचा घाट घातला. आपण थकलो असल्याने वाचनात फार लक्ष लागणार नाही, असं सांगणाऱ्या लीना भागवत यांचा थकवा नाटकाचा विषय पाहून पळून गेला आणि केवळ वाहवा न करता ‘आपण सर्वांनी मिळून असे विषय रंगभूमीवर आणले पाहिजेत,’ अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनीही कंबर कसली.प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांनीही ‘असा रोल मराठी नाटकात आजवर लिहिलाच गेला नाही,’ अशी प्रतिक्रिया नोंदवून नाटकात काम करण्याची तयारी केली.मंगेश कदम यांनी हे नाटक दिग्दर्शित केलंय. नंदू कदम यांनी निर्मितीची जबाबदारी उचलली. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्याचं अवघड आव्हान पेललं आणि तालमी सुरू झाल्या. निर्मितीची प्रक्रियाही इतर व्यावसायिक नाटकांसारखी ठाशीव नव्हती, असं या चमूतले सर्वच कलावंत, तंत्रज्ञ सांगतात. (प्रतिनिधी)दोघे सातारकर, म्हणून...अभिनेत्री अमृता सुभाष याही सातारकरच. रहिमतपूर त्यांचं आजोळ, तर साताऱ्यात बालपण व्यतीत झालेलं. त्यामुळं पहिला प्रयोग साताऱ्यात करण्याची कल्पना पुढे आली आणि सर्वांनी उचलून धरली. ही ‘परफेक्ट मॅच’ व्यक्तींची टीम रविवारी पहिला प्रयोग शाहू कला मंदिरात करून एका अर्थानं शिवधनुष्यच पेलू पाहत आहे.