शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : तळहिरा तलावातून पाण्याची राजरोस चोरी, पाणीसाठा खालावला : तीन गावांत पाणी टंचाईचे सावट; इलेक्ट्रिक मोटारीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:14 IST

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात या भागाला पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

ठळक मुद्देपाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट लक्ष न दिल्यास भविष्यात पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय नाहीइलेक्ट्रिक मोटारी टाकून दिवस-रात्र तलावातील पाणी चोरण्याचा धक्कादायक प्रकार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात या भागाला पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.यावर्षी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे तळहिरा तलावात कमी पाणीसाठा झाला. परिणामी या तलावावर अवलंबून असलेल्या अनेक गावांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.

कारण असलेला पाणीसाठा टिकला तरच उन्हाळ्यातील काही महिने या परिसरातील गावांची तहान भागणार आहे. मात्र, सध्या दिवस-रात्र या तलावातील पाणी इलेक्ट्रिक मोटारी टाकून चोरण्याचा धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू आहे. हे पाणी दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे.

वाठार स्टेशन, तळिये व देऊर या प्रमुख तीन गावांची तहान भागवणारा हा तळहिरा तलाव आहे. गेल्या पाच वर्षांत पूर्ण क्षमतेने कधीच भरला नाही. चालू वर्षीही जिल्ह्यातील सर्वच मोठी धरणे, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असताना तळहिरा तलावात मात्र केवळ ३० टक्के एवढाच पाणीसाठा झाला आहे.

यातून देऊरमधील हंगामी शेती तसेच परवानाधारक शेतकरी यांच्यासाठी या पाणी सोडले गेले तर या तलावात पाणीच शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या या तलावात परवानाधारक शेतकºयांशिवाय अनेक बिनापरवाना मोटारीद्वारे या तलावातील पाणी शेतीसाठी वापरले जात आहे.देऊर व तळिये गावात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तलावात गेल्या त्यांच्यासाठी या तलावातून पाणी देण्याची व्यवस्था असल्याने शेतीसाठी हे पाणी हे शेतकरी वापरत आहेत; परंतु असणाऱ्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी चोरी होत असल्याने या तलावातील पाणी रातोरात कमी होऊ लागले आहे. याला संबंधित पाटबंधारे विभागाने आळा घातला नाही तर असणारा पाणीसाठा अगदी काही दिवसांतच संपुष्टात येईल, अशी परिस्थिती आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी