सातारा : लोणंद रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:01 IST2018-08-01T16:58:59+5:302018-08-01T17:01:55+5:30

लोणंद रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्री शिवथर हद्दीत दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. अमित सुभाष भोसले (वय २५, अरबवाडी, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे.

Satara: The victim of youth due to potholes on Lonand road | सातारा : लोणंद रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी

सातारा : लोणंद रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी

ठळक मुद्देलोणंद रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळीमृतदेह सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल

सातारा : लोणंद रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्री शिवथर हद्दीत दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. अमित सुभाष भोसले (वय २५, अरबवाडी, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा-लोणंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सातारा तालुक्यातील शिवथर परिसरात दीड फूट खोलापर्यंत खड्डे पडले आहेत, त्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

मंगळवारी मध्यरात्री अमित भोसले साताऱ्यावरून लोणंदच्या दिशेने दुचाकीवर (एमएच १२ एफ १९९६) जात होता. यावेळी अंधारामध्ये रस्त्यामधील खड्डा न दिसल्याने त्याची दुचाकी जोरात खड्ड्यात आदळली. त्यामुळे अपघात होऊन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही बाब बुधवारी सकाळी निदर्शनास आली. त्यानंतर नागरिकांनी मृतदेह सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार नंदकुमार मोरे, संभाजी गभाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Web Title: Satara: The victim of youth due to potholes on Lonand road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.