शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा नगरपालिकेची आज अंदाजपत्रकीय सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST

सातारा : सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा शुक्रवार, दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या सभेत उपनगराध्यक्ष ...

सातारा : सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा शुक्रवार, दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या सभेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे ३०७ कोटी ४७ लाख ६६ हजार ४२४ रुपयांचे अंदाजपत्रक ऑनलाईन जाहीर करणार आहेत.

हद्दवाढीमुळे पालिकेचे अंदाजपत्रक यंदा ३०७ कोटींवर गेले आहे. या अंदाजपत्रकाच्या पुस्तकातून गोषवारा पत्रकच गायब असल्याने नक्की किती कोटींचे अंदाजपत्रक यावरून नगरसेवकांत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या विषयावर सभेत खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, सभेच्या पूर्वी सत्ताधारी सातारा विकास आघाडी व विरोधी नगर विकास आघाडी यांच्या स्वतंत्र बैठका गुरुवारी पालिकेत झाल्या. साविआच्या बैठकीत अंदाजपत्रकाच्या रणनीतीवर त्रोटकच चर्चा झाली. तर नगरविकास आघाडीने व्यापारी गाळ्यांच्या संपलेल्या मुदती, लांबलेली चतुर्थ वार्षिक पाहणी, कर वसुली, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रलंबित थकबाकीचा राहिलेला अनुल्लेख या विषयावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखली असल्याची चर्चा आहे.

पालिकेकडून उत्पन्नवाढीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. मुदत संपलेले गाळे ताब्यात घेतले नाहीत. करंजेतील भूखंडांची परिस्थितीही तशीच आहे. त्यामुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. करवसुलीचे उद्दिष्ट यंदा पूर्ण होईल की नाही, हे प्रश्नचिन्हच आहे. यासह विविध विषयांवरून सभेत वादंग होण्याची चिन्हे आहेत.

फोटो : पालिकेचा फोटो वापरणे