शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

सातारा : ग्रामपंचायत उमेदवारांचा मान....शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:24 IST

निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज  भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते.

ठळक मुद्देसातारा : ग्रामपंचायत उमेदवारांचा मान....शेवटच्या दिवशी सर्व्हरवर ताण!निवडणूक : अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घातली उमेदवारांना साद

सातारा : निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज  भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. या पार्श्वभूमीवर ऐनवेळी धावाधाव नको...सगळेच दमतात, उमेदवारी अर्ज दाखल करा..., अशी साद जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना घातली आहे.जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे कामकाज सुरु झाले आहे. जिल्हा आकाराने मोठा आहे. जिल्ह्यात १४९६ ग्रामपंचायती आहेत. साहजिकच राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतो. त्यात सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा समावेश नेहमीच असतो.

मागील टप्प्यात मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आॅनलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांनी तहसीलदारांकडे आॅनलाईन अर्जाची प्रिंट व कागदपत्रे द्यावयाची असतात. मात्र ऐनवेळी अर्ज दाखल करुन घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तसेच तहसीलदारांकडे अर्ज दाखलकरण्याची गडबड सुरु केल्याने प्रशासनाची भलतीच पळापळ झाली.अनेकदा शासनाच्या सर्व्हरवरही बंद पडतो. तेव्हा उमेदवारांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासकीय यंत्रणेवरही ताण येत असतो. सातारा जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र अद्यापही अर्ज भरण्याबाबत उमेदवारांचा अल्प प्रतिसाद मिळतो आहे. दोन दिवस झाले आहेत.उमेदवार ऐनवेळी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी गडबड करणार, हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वेळेत येऊन उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. महसूल उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना हे आवाहन करण्याबाबत लेखी सूचना केली आहे.४८ सरपंच व ३८२ सदस्यपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. ६ सप्टेंबरअखेर सरपंचपदासाठी अवघे ५ आणि सदस्यपदासाठी अवघे १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. स्थानिक राजकारणात रस असणारे उमेदवार प्रतिस्पर्ध्यांचा अंदाज घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करत असतात. काही मंडळी नेत्यांचे आदेश येण्याची वाट पाहत असतात.

आदेश होताच मग कागदपत्रांची जुळवाजुळव करुन अर्ज दाखल करण्याची धावाधाव सुरु होते. अनेकांना ऐनवेळी दाखले मिळत नाहीत, त्यामुळे उमेदवारी अर्जही भरता येत नाहीत. हे नुकसान टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. ५ सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करुन घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल केले गेल्यास संपूर्ण यंत्रणेवर ताण येतो. हे लक्षात घेऊन वेळ आहे तर उमेदवारांनी वाट न पाहत बसता अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.- अविनाश शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसर