सातारा जिल्हा : राष्ट्रवादीच्या आमदारांचे शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: September 26, 2014 23:31 IST2014-09-26T22:52:01+5:302014-09-26T23:31:48+5:30
सातव्या दिवशी ६९ अर्ज दाखल

सातारा जिल्हा : राष्ट्रवादीच्या आमदारांचे शक्तिप्रदर्शन
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी आठही विधानसभा मतदारसंघात ६९ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व विद्यमान आमदार त्याचबरोबर प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात आठही विधानसभा मतदारसंघातून ७५ उमेदवारांनी १७२ अर्ज विकत घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. दरम्यान, शनिवारी (दि. २७) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब शिरसाट (काँग्रेस, अपक्ष), आनंदा अगवणे (अपक्ष), चंद्रकांत साळवी (अपक्ष), राहुल अहिवळे (अपक्ष), भगवान खवळे (अपक्ष), संजय निकाळजे (अपक्ष), पोपटराव काकडे (काँग्रेस, अपक्ष), दादासाहेब गायकवाड (बसपा, दोन अर्ज), धोंडिराम वाघमारे (अपक्ष), दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - २, अपक्ष), संजय कांबळे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.
वाईमधून मदनराव भोसले (अपक्ष), मकरंद पाटील (राष्ट्रवादी-२), दत्तात्रय बावळेकर (शिवसेना-२), राजन मोरे (बसपा-३), कुंडलिक ठोंबरे (अपक्ष) यांनी अर्ज भरले.
कोरेगाव मधून शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून दोन अर्ज दाखल केले.
माणमधून अजीनाथ केवटे (अपक्ष), शिवाजी जाधव (अपक्ष), रणजित देशमुख (अपक्ष), शेखर गोरे (रासप) यांनी अर्ज दाखल केले.
‘कऱ्हाड उत्तर’मधून धैर्यशील पाटील (काँग्रेस, अपक्ष), बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी-४ अर्ज) यांनी अर्ज दाखल केले.
पाटणमधून चंद्रकांत यादव (अपक्ष), शंभूराज देसाई (शिवसेना), सुनील कांबळे (स्वाभिमानी रिपब्लिकन युथ, अपक्ष), प्राणलाल माने (अपक्ष), विक्रमसिंह पाटणकर (अपक्ष), सत्यजित पाटणकर (राष्ट्रवादी-३), संदीप माने (शेकाप), सागर माने (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.
सातारा-जावळीतून शिवेंद्रसिंंहराजे भोसले (राष्ट्रवादी-३), वेदांतिकाराजे भोसले (अपक्ष-३), सागर भिसे (अपक्ष), सचिन गंगावणे (स्वाभिमानी रिपब्लिकन युथ, अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.
दरम्यान, आज, शुक्रवारी फलटणमधून
१९ उमेदवारांनी ५१ अर्ज, वाई १३ (२५), कोरेगाव १२ (२१), माण ७ (१७), कऱ्हाड उत्तर ९ (१२) कऱ्हाड दक्षिण
९ (१०), पाटण १३ (१८), तर सातारा-जावळीतून
७ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केल्याची
माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘कऱ्हाड दक्षिण’मधून देवेंद्र शहा (अपक्ष), अतुल भोसले (भाजप), सुरेश भोसले (अपक्ष), गोरख शिंंदे (अपक्ष), संपत तडाखे (अपक्ष), राजेंद्र घारे (अपक्ष), राजेंद्र यादव (अपक्ष २ अर्ज), चंद्रशेखर विभुते (राष्ट्रवादी, अपक्ष), सतीशकुमार यादव (मनसे), दादा शिंगण (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.