शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, वाईच्या नगराध्यक्षांना तुरुंगात टाकू !

By admin | Updated: April 1, 2015 00:08 IST

रामदास कदम : ‘कृष्णा’ प्रदूषणप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा

मुंबई : राज्यातील २६ महापालिका व २२७ नगरपालिका राज्यातील नद्यांचे ६० टक्के प्रदूषण करतात, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी विधान परिषदेत देणाऱ्या पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सातारा जिल्ह्यातील सातारा व वाई नगरपालिकेने एक महिन्याच्या अवधीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता २५ टक्के रक्कम राखून ठेवली नाही, तर या नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला.आनंदराव पाटील यांनी याबाबत लक्ष्यवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना पर्यावरणमंत्री कदम म्हणाले की, राज्यातील महापालिका व नगरपालिकांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सोडले पाहिजे. मात्र, गेल्या ४० ते ४५ वर्षांत या दिशेने फारसे प्रयत्न झाले नाहीत. कऱ्हाड नगरपालिकेला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता ६३ कोटी रुपये मंजूर झाले असून, दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. मलकापूर नगरपालिकेला ४१ कोटी रुपये मंजूर झाले असून, आठ महिन्यांत तेथील प्रकल्प पूर्ण होईल.पुढील आठवड्यात सातारा व वाई या दोन्ही नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना आपण बोलावून घेऊ. त्यांनी एक महिन्यात आर्थिक तरतूद करून दिली नाही, तर मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकू. राज्यातील ५० टक्के नगरपालिकांनी २५ टक्के रकमेची तरतूद केली आहे, तर तेवढ्याच नगरपालिकांनी तरतूद करण्याकरिता कालावधी मागितला आहे, असे कदम यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)३० दशलक्ष लिटर पाण्याचे प्रदूषण३० सातारा व वाई नगरपालिकांनी एक महिन्यात आपल्या एकूण निधीपैकी २५ टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया याकरिता राखून ठेवण्याची तयारी दाखवली, तर त्यांना केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करून देऊ, असे कदम म्हणाले. कृष्णेत नगरपालिकांकडून सध्या ३० दशलक्ष लिटर पाण्याचे प्रदूषण केले जाते.