Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 21:59 IST2025-11-01T21:57:36+5:302025-11-01T21:59:19+5:30
आचल लखन पवार (वय १८, रा. सोमवार पेठ, फलटण), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
सातारा : आई-वडिलांची सततची भांडणे व वडील सतत दारू पीत असल्याच्या कारणातून मुलीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले. ही धक्कादायक घटना फलटण येथे दि. ३१ रोजी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.
आचल लखन पवार (वय १८, रा. सोमवार पेठ, फलटण), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आचल पवार हिचे आई-वडील सतत भांडण करत होते. तसेच वडील सतत दारू पीत होते.
मानसिक त्रास सहन न झाल्याने आचल हिने राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचा गळफास सोडवून तातडीने तिला फलटण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
परंतु तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला बारामती येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, दि. ३१ रोजी पहाटे चार वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची फलटण शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार रणवरे हे अधिक तपास करीत आहेत.