शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा दुर्घटनेतील डॉल्बी मात्र निसटली !

By admin | Updated: September 11, 2014 23:16 IST

एकच मशीन : पोलीस म्हणतात, आम्ही कुठे-कुठे धावाधाव करायची?

सातारा : आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या २५ डॉल्बींची यादी पोलिसांतर्फे जाहीर करण्यात आली असली, तरी अनेक सिस्टिम कारवाईतून निसटल्याचे स्पष्ट झाले असून, त्यातील अनेक डॉल्बी सिस्टिम भिंत कोसळण्याच्या घटनेवेळी राजपथावर दणाणत होत्या. तथापि, एकच मशीन घेऊन आम्ही कुठे-कुठे जायचे, असा प्रश्न उपस्थित करून सर्वच डॉल्बी कारवाईच्या यादीत नसल्याच्या चर्चेला पोलिसांनी पुष्टी दिली.गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी राजपथावर जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत कोसळून तीन जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर डॉल्बी चर्चेत आली आहे. संबंधित इमारतीच्या मालकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे; मात्र या घटनेस डॉल्बीही काही अंशी जबाबदार असल्याचे पुराव्यानिशी शाबीत करणे तांत्रिकदृष्ट्या अवघड असल्याने पोलिसांनी डॉल्बीबाबत मौन बाळगले आहे. दरम्यान, घटनेवेळी राजपथावर एकंदर आठ ते दहा डॉल्बी दणाणत होत्या, असे राजपथावरील रहिवाशांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. तथापि, त्यातील काही डॉल्बी मोठ्या आवाजात दणाणत असल्याची चर्चा संपूर्ण शहरभर असताना, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ज्या डॉल्बींवर कारवाईची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येत आहे, त्या यादीतून काही डॉल्बी निसटल्याचे दिसत आहे.यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, शहर पोलीस ठाण्याकडे एकच ध्वनिमापन यंत्र उपलब्ध होते आणि मिरवणुकीदरम्यान त्याच्याच साह्याने सर्व डॉल्बी सिस्टिमचे ध्वनिमापन करावे लागत होते, अशी माहिती देण्यात आली. म्हणजेच, घटना घडली त्या ठिकाणी आणि नेमक्या त्यावेळी पोलिसांचे ध्वनिमापन यंत्र पोचलेच नसावे, असाच निष्कर्ष निघतो. प्रत्यक्षदर्शींनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाच्या आसपास दणाणणाऱ्या डॉल्बींची कंपने भयावह होती. मात्र, पोलिसांनी तयार केलेल्या यादीतून अशा अनेक सिस्टिम निसटल्या असून, ध्वनिमापन यंत्रे अपुरी पडली असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)चौदा प्रस्ताव एसपींना सादरआवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण २५ मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावरील कारवाईचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे सादर करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत असे सुमारे १४ प्रस्ताव एसपींकडे पाठविण्यात आले होते.