शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

सासवडच्या विहिरी चक्क पेट्रोल डिझेलने भरल्या, अज्ञातांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 19:11 IST

Petrol sataranews- मुंबई -पुणे -सोलापूरला जाणाऱ्या पेट्रोल - डिझेल पाईप लाईन मधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना लाईन फुटल्याने सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी या पेट्रोल डिझेलने भरून गेल्या आहेत. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे त्याठिकाणी चक्क पेट्रोल - डिझेलचे झरे वाहू लागले आहेत. त्यामुळे पाणी दुषित होऊन पिके जळाली असून मासे, बेडूक, साप मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत लोणंद पोलीसात पेट्रोल कंपनीने तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसासवडच्या विहिरी चक्क पेट्रोल डिझेलने भरल्याइंधनाच्या वाढत्या महागाईमुळे चोरट्यांनी नियोजबद्धरित्या फोडली पाईप लाईन

आदर्की : मुंबई -पुणे -सोलापूरला जाणाऱ्या पेट्रोल - डिझेल पाईप लाईन मधून पेट्रोल चोरीचा प्रयत्न करताना लाईन फुटल्याने सासवड परिसरातील शेतं आणि विहिरी या पेट्रोल डिझेलने भरून गेल्या आहेत. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे त्याठिकाणी चक्क पेट्रोल - डिझेलचे झरे वाहू लागले आहेत. त्यामुळे पाणी दुषित होऊन पिके जळाली असून मासे, बेडूक, साप मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत लोणंद पोलीसात पेट्रोल कंपनीने तक्रार दाखल केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई- पुणे -सोलापूर अशी एका कंपनीची उच्चदाब पेट्रोल पाईपलाईन जमिनीखालून सासवड ( झणझणे ) ता . फलटण गावच्या हद्दीतून गेली आहे. सासवड गावापासून दोन कि.मी अंतरावर खडकमाळ नावाच्या शिवारात पाईपलाईन मधून पेट्रोल मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागल्याने संबधित कंपनीचे अधिकारी, लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यावेळी चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या पाईपलाईन फोडल्याचे निदर्शनास आले.

शेतातील ऊसाच्या सऱ्या,ज्वारीचे वाफे यामध्ये लाखो लिटर पेट्रोल साठून राहिल्याने ज्वारी, मका, ऊस , गवत करपून गेले आहे. संबधीत कंपनीने टँकरद्वारे पेट्रोल भरून नेण्यात सुरूवात केली आहे. घटनास्थळापासून १ किमी परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला असून घटनास्थळी अग्नीशमक दलाची गाडी उभी करण्यात आली आहे. एका विहिरीतून पाणी मिश्रीत पेट्रोल टँकर भरण्याचे काम सुरू आहे. विहिरीत चार इंच पेट्रोलचा थर आल्याने परिसरात पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे शेतकरी व जनावरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.तीन दिवसांपासून सुरु आहे गळतीसासवड परिसरात पेट्रोलची दुर्गधी येत असून शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. संबधित कंपनीने पेट्रोल पाईप लाईन तातडीने बंद केली. पंरतू पाईपलाईन मधील पेट्रोलची तीन दिवस गळती सुरु होती. हे पेट्रोल कंपनीने टँकरव्दारे भरून नेण्याचे काम दोन दिवसांपासून सुरु आहे. विहीरीत उतरलेले पेट्रोल टँकरमध्ये भरण्याचे काम आजही सुरू आहे. हजारो लिटर पेट्रोल वाया गेल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलSatara areaसातारा परिसर