शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

संतोष पोळची पत्नी पोलिस ठाण्यात

By admin | Updated: August 20, 2016 23:26 IST

बातमी ऐकून म्हणे, धक्का बसला!

सातारा : सिरियल किलर संतोष पोळच्या पत्नीने शनिवारी दुपारी मुंबईहून साताऱ्यात येऊन पोलिसांना जबाब दिला. ‘पतीने खून केल्याचे समजल्यानंतर मला धक्काच बसला. तो काय करायचा, याची मला कसलीही कल्पना नव्हती,’ असेही तिने पोलिसांना सांगितले.संतोष पोळची प्रेयसी ज्योती मांढरे हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर पोळची पत्नी लहान मुलाला घेऊन मुंबई येथे आपल्या माहेरी गेली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय तिच्यावर अधिकच बळावला होता. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधल्यानंतर ‘आपण सहकार्य करू,’ असे पोळच्या पत्नीने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे शनिवारी दुपारी पोळची पत्नी, तिचे वडील आणि दोन मुले मुंबईहून साताऱ्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सुमारे दोन तास तिची चौकशी केली. ‘पतीने एवढे खून केले असावेत, याचा विश्वासच बसत नाही. टीव्हीवर आणि पेपरमध्ये वाचून हे सर्व मला समजले,’ असे तिने सांगितले आहे. ‘यापुढे चौकशीसाठी बोलावले तर परत येईन,’ असे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्ाी मुलांसमवेत मुंबईला निघून गेली. (प्रतिनिधी)मेहुणा करतोय ग्रामस्थांना दमदाटी !संतोष पोळचा मेहुणा सुरेश हगवणे हा धोम ग्रामस्थांना दमदाटी करत आहे. ‘प्रसारमाध्यमांना आणि पोलिसांना कोण माहिती देत आहे. त्याला बघून घेतो,’ अशी तो धमकी देत आहे. त्यामुळे धोम ग्रामस्थांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्याच्याविरोधात वाई पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावेळी मोठ्या संख्येने धोम ग्रामस्थ पोलिस ठाण्यासमोर जमा झाले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. - संबंधित बातमी/हॅलो १ वर