शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ९१ अर्जांची विक्री

By admin | Updated: April 5, 2015 00:01 IST

जिल्हा बँक निवडणूक : उदयनराजे, जयकुमार, शंभूराज यांची आघाडी

सातारा : ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवार (दि. ४) पासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी ३४ जणांनी ९१ उमेदवारी अर्ज खरेदी केले. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी ४ अर्ज, आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी महेश बोराटे यांनी ५, आमदार शंभूराज देसाई यांच्यासाठी उत्तम कवर यांनी ४, तर राजेश पाटील यांच्यासाठी संतोष किर्दत यांनी १, प्रदीप विधाते यांच्यासाठी तुकाराम यादव यांनी २, अरुण विष्णू पवार यांनी स्वत:साठी २, प्रभाकर साबळे यांच्यासाठी राजेंद्र नांगरे यांनी ३, रवींद्र कदम यांच्यासाठी अमर मोकाशी यांनी १५, राजेंद्र यशवंत नेवसे यांनी स्वत:साठी ३, प्रमिला चंद्रकांत कदम यांच्यासाठी शरद कदम यांनी १, वसंतराव मानकुमरे यांनी स्वत:साठी २, गीतांजली कदम यांनी स्वत:साठी २, सचिनकुमार नलावडे यांनी स्वत:साठी २, सुरेश गायकवाड यांनी स्वत:साठी २, नंदकुमार गोडसे यांच्यासाठी विवेक देशमुख यांनी २, संतोष पवार यांच्यासाठी कल्याण देशमुख यांनी २, रंजना साळुंखे यांच्यासाठी महादेव साळुंखे यांनी ३, किशोर हिंदुराव साळुंखे यांनी स्वत:साठी २, सुरेश गंगाराम साळुंखे व रामभाऊ आनंदराव लेंभे यांच्यासाठी शांताराम फडतरे यांनी ४, सुरेखा रमेश पाटील यांनी स्वत:साठी १, डॉ. विजयराव बोरावके यांनी स्वत:साठी २, सुरेखा रमेश पाटील यांनी स्वत:साठी १, विश्वासराव विठ्ठलराव काळे यांनी स्वत:साठी १, नामदेव सीताराम गोडसे स्वत:साठी १, शामराव लक्ष्मणराव गाढवे व आनंदराव शेळके-पाटील यांनी स्वत:साठी प्रत्येकी २, दत्तात्रय नानासो बिचुकले यांच्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी १, सुरेंद्र गुदगे यांनी स्वत:साठी ३, बाळकृष्ण हुबले यांच्यासाठी अर्जुन काळे यांनी २, सुनीता धैर्यशील कदम यांच्यासाठी ऋषिकेश ताटे यांनी २, बाळासाहेब शिरसट यांनी स्वत:साठी २, दिनकर पाटील यांच्यासाठी वैभव जाधव यांनी ५ उमेदवारी अर्ज खरेदी केले. अर्ज दाखल करण्याची मुदत ४ ते ८ एप्रिल या कालावधीत आहे. या निवडणुकीसाठी दोन हजार २६८ मतदारांची नोंद झालेली आहे. हे मतदार २१ संचालकांची निवड करणार आहेत. निवडणुकीसाठी दि. ५ मे रोजी मतदान होणार आहे. माण तालुक्यातून सोसायट्यांचे सर्वांत जास्त २२ ठराव सादर झाले असून, नवीन ठरावांची मुदत संपली आहे. अर्ज खरेदीची किंमत शंभर रुपये असून, खुल्या गटासाठी उमेदवारी अर्ज भरताना दोन हजार रुपये इतकी, तर राखीव प्रवर्गासाठी पाचशे रुपये इतकी अनामत रक्कम भरावी लागणार आहे.