शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्ती आली तरी फौजदाराची टोपी दूरच !

By admin | Updated: November 16, 2015 23:58 IST

निवड झाली; नियुक्ती नाही : जिल्हा पोलीस दलातील ७६ हवालदारांची व्यथा--लोकमत विशेष

दत्ता यादव -- सातारा -खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन फौजदारपदी निवड झालेल्या ७६ हवालदारांना फौजदारांच्या टोपीने दोन वर्षांपासून हुलकावणी दिली आहे. ‘तांत्रिक’ कारणामुळे त्यांना नियुक्ती मिळत नाहीये आणि वाट पाहून-पाहून आता त्यांची काम करण्याची इच्छाही मंदावत चालली आहे. अनेकजण तर निवृत्तीकडे झुकले आहेत.फौजदार बनणे हे हवालदाराचे स्वप्न असते. फौजदारपदी थेट नियुक्तीबरोबरच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या खात्यांतर्गत परीक्षांमधूनही नियुक्त्या होत असतात. तथापि, थेट नियुक्ती जितकी झटपट मिळते, तितकी झटपट खात्यांतर्गत नियुक्ती मिळत नाही. अशा ‘रखडलेल्या’ हवालदारांची संख्या जिल्हा पोलीस दलात तब्बत ७६ इतकी असल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्वांनी पोलीस उपनिरीक्षकपदासाठी २०१३ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा दिली असून, ते उत्तीर्णही झाले आहेत. निवड झाल्याचे समजताच हवालदारांच्या कुटुंबांत दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र, नंतर दोन दिवाळ्या उलटल्या तरी फौजदाराची टोपी काही डोक्यावर येईना, अशा अवस्थेत आनंद मावळत चालला आहे.निवड झाल्यानंतर फौजदाराचा पगार मिळावा, अशी अपेक्षा बाळगणे गैर नाही; मात्र दोन वर्षे हे ७६ जण हवालदाराच्याच पगारावर काम करीत आहेत. निवड झालेल्यांमध्ये काही जणांची केवळ दीड वर्ष तर काही जणांची चार वर्षे सेवा उरली आहे.या हवालदारांच्या हाती फौजदाराचा दंडा आलेला नाही. ‘निवृत्ती घेतल्यानंतर आॅर्डर येऊन काय उपयोग,’ असा उद्विग्न सवाल हे हवालदार खासगीत उपस्थित करतात. निवड झालेल्या हवालदारांची कोल्हापूर परिक्षेत्रात कोठेही नियुक्ती होऊ शकते. मात्र, रिक्त जागा नसल्याचे सांगून शासनाकडून या हवालदारांची बोळवण केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. काही जण फौजदाराची टोपी घालण्यासाठी महाराष्ट्रात कुठेही काम करायला तयार आहेत. अधिकारी फुलपगारी, हवालदार अधांतरीथेट नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने पूर्ण पगार मिळू लागतो. मात्र, खात्यांतर्गत निवड झालेल्या पोलिसांना नियुक्तीच नसल्याने वर्षानुवर्षे हवालदाराच्याच पगारावर राबावे लागत आहे. खात्यात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या पोलिसांना जास्त अनुभव असतो. निर्णयप्रक्रिया त्यांच्या हाती आल्यास तपास जलदगतीने होऊ शकतो. असे असताना त्यांच्या अनुभवाचा फायदा न घेता त्यांना ताटकळत ठेवले जात आहे.राज्यात २६०० पदे रिक्तएकीकडे नियुक्तीसाठी ताटकळणाऱ्या हवालदारांची संख्या वाढत असताना राज्यात पोलीस उपनिरीक्षकांची २६०० पदे रिक्त आहेत. या पदांवर खात्यांतर्गत निवड झालेल्या हवालदारांना संधी दिल्यास अनेक प्रश्न एकाच वेळी सुटू शकतात; मात्र हवालदारांबद्दलची सरकारी अनास्था हे घडू देत नाही.