Satara Crime: चितळीत पूर्ववैमनस्यातून निवृत्त जवानाचा खून, दोन आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:47 IST2026-02-20T13:47:30+5:302026-02-20T13:47:46+5:30

तलवार, कुऱ्हाडीने हल्ला 

Retired jawan Ranjit Madan Nikam from Chitali Satara district murdered due to past enmity | Satara Crime: चितळीत पूर्ववैमनस्यातून निवृत्त जवानाचा खून, दोन आरोपी अटकेत

Satara Crime: चितळीत पूर्ववैमनस्यातून निवृत्त जवानाचा खून, दोन आरोपी अटकेत

मायणी : खटाव तालुक्यातील चितळी येथील सेवानिवृत्त जवान रणजीत मदन निकम (वय ३८) यांचा गावातील महादेव मंदिरानजीकच्या तालमीसमोर तलवार, कोयता व कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर अवघ्या दोन तासांत मायणी व वडूज पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

चितळी येथील तालमीमध्ये सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रणजीत निकम हे आपल्या मुलाला घेऊन गेले होते. काही कामानिमित्त ते तालमीच्या बाहेर आले. त्यावेळी मागून पृथ्वीराज संभाजी पवार (२२), पवन संतोष पवार (१९), संतोष महादेव पवार, भरत शशिकांत पवार व एक अल्पवयीन मुलगा, असे पाच जण (सर्व रा. चितळी, ता. खटाव, जिल्हा सातारा) तेथे आले. त्यांनी तलवार, कोयता व कुऱ्हाडीने जवान रणजीत निकम यांना जबर मारहाण केली आणि ते पळून गेले. जखमी रणजीत यांना मायणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी रात्री उशिरा पृथ्वीराज पवार व पवन पवार या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि.२४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अन्य दोघे व एका अल्पवयीन आरोपी मुलाचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील, बीट अंमलदार आनंदा गंबरे तपास करीत आहेत.

गावात पोलिस बंदोबस्त

चितळी येथे जवानाचा खून झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी गावात पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. गावात तणावाची परिस्थिती आहे.

Web Title : सतारा: चितली में सेवानिवृत्त सैनिक की हत्या; दो गिरफ्तार

Web Summary : सतारा के चितली में सेवानिवृत्त सैनिक रंजीत निकम की हत्या कर दी गई। पूर्व दुश्मनी के चलते तलवार और कुल्हाड़ियों से हमला किया गया। पुलिस ने दो संदिग्धों को गिरफ्तार किया है और अन्य शामिल लोगों की तलाश जारी है। गांव में तनाव है और पुलिस की मौजूदगी बढ़ा दी गई है।

Web Title : Satara: Retired Soldier Murdered in Chitli; Two Arrested

Web Summary : A retired soldier, Ranjeet Nikam, was murdered in Chitli, Satara. The attack, stemming from prior animosity, involved swords and axes. Police arrested two suspects and are searching for others involved. Tensions are high, and police presence has increased in the village.