शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बिशीच्या माध्यमातून रूजतेय वाचन संस्कृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:14 IST

साताऱ्यातील अ‍ॅड. सिमंतिनी नुलकर आणि स्वाती राऊत यांच्या संकल्पनेतून पुस्तक बिशीची स्थापना करण्यात आली. चार महिला एकत्र आल्या की ...

साताऱ्यातील अ‍ॅड. सिमंतिनी नुलकर आणि स्वाती राऊत यांच्या संकल्पनेतून पुस्तक बिशीची स्थापना करण्यात आली. चार महिला एकत्र आल्या की त्यातून ज्ञान वाटपाचे काम झाले पाहिले. वाचनाची समृध्दता आणि मराठी भाषेची व्यापकता या दोन्हींचा सुवर्ण मिलाफ साधण्याचा संकल्प घेऊन याची मुहूर्तमेढ रोवली गेली. या बिशीत आता ४० सदस्यांचा सहभाग असतो. बिशीत समाविष्ट होण्याचा पुस्तक वाचनाची आवड हा एकच निकष असल्याने यात डॉक्टर, घरकामगार, अभियंते, विद्यावाचस्पती प्राप्त महिलांचा समावेश आहे.

पुस्तकांची बिशी याच नावाने सुरू असलेल्या या बिशीने गेल्या आठ वर्षांत अनेक महिलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली. महिन्यातून एकदा भेटणं आणि आपण वाचलेल्या पुस्तकांची कहाणी सांगण आणि इतरांच्या ऐकणं यात निघून गेलेला वेळ पुढं आयुष्यभरासाठी समृध्दता देऊन जातो, असे अनुभव यासाठी कार्यरत असलेल्या महिलांचे आहेत.

१. व्यक्त होण्यासाठी दिलं व्यासपीठ

पुस्तक बिशीच्या ग्रुपतर्फे अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यातही नाविन्य येण्याच्या उद्देशाने ग्रुपमध्ये एक फोटो पाठवून त्यावर काव्य करण्याचे ठरविण्यात आले. एका सुर्याेदयावर विविध पध्दतीने भाष्य करणाºया कवितांची निर्मिती हे या उपक्रमाचे फलित ठरले.

२. सर्व स्तरांतील महिलांचा सहभाग

पुस्तक वाचन आणि ज्ञानार्जन या दोन्ही बाबी आवडीवर अवलंबून असते. त्याला आर्थिक, सामाजिक आणि अनेकदा शैक्षणिक स्तराचाही काही संबंध रहात नाही, याची अनुभूती या बिशीत आली. घरगुती काम करणाºया महिलांनीही या बिशीचा एक भाग व्हायचं ठरवलं आणि माधुरी पेंढारकर आणि कुसूम कदरकर यात सहभागी झाल्या. पुस्तकांविषयी बोलण्याइतपत त्या भिडस्त झाल्या नसल्या तरी लेखक, त्यांची पुस्तकं आणि लिखाणाची खासियत यांची माहिती त्यांना यातून मिळाली.

३. उलटं कविता वाचन !

या ग्रुपच्या सक्रिय सदस्या सविता कारंजकर यांना उलटं गाणं गायची आणि उलट कविता वाचनाचा छंद आहे. यातूनही धम्माल करमणूक होते. गटात प्रगती पेंढारकर या विशेष मुलीनेही वाचनाची आवड जोपासत आपली बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला.

कोट :

या बिशी गटाच्या माध्यमातून अनेक पुस्तकं आणि उत्तम लेखक आम्हाला गवसले. नुकताच आम्हाला अश्वमेधतर्फे उत्कृष्ट ग्रंथ वाचक म्हणून गौरविण्यातही आले.

- अ‍ॅड. सिमंतिनी नुलकर, पुस्तक बिशी, सातारा