जावळी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी रजनीकांत गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:57 IST2021-02-23T04:57:57+5:302021-02-23T04:57:57+5:30

कुडाळ : जावळी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी रजनिकांत गायकवाड, तर सचिवपदी दुर्योधन शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र ...

Rajnikant Gaikwad as the President of Jawali Taluka Gramsevak Sanghatana | जावळी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी रजनीकांत गायकवाड

जावळी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी रजनीकांत गायकवाड

कुडाळ : जावळी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी रजनिकांत गायकवाड, तर सचिवपदी दुर्योधन शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ तालुका शाखा जावळीची पंचवार्षिक निवडणूक २०२१ ते २०२६ करिता नूतन कार्यकारिणीची निवड सभा निवडणूक निरीक्षक मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये जावळी तालुका अध्यक्षपदी रजनीकांत गायकवाड, तर सचिवपदी दुर्योधन शेलार, कार्याध्यक्ष संजय ससाणे, उपाध्यक्ष शंकर माने, महिला उपाध्यक्ष अपर्णा जाधव, सहसचिव संतोष देशमुख, कोषाध्यक्ष प्रकाश माने, कायदेशीर सल्लागार समाधान जाधव, संघटक राजेंद्र राऊत, महिला संघटक आयेशा मोमीन, ज्ञानेश्वर धनावडे, कार्यकारिणी सदस्य रवींद्र निकम, चंद्रकांत कोळी, युवराज पवार, सुधीर रांजणे यांची निवड करन्यात आली.

यावेळी अशोक कोळी, सतीश पिसाळ, बी. टी. माळी, तसेच तालुक्यामधील सर्व ग्रामसेवक, ग्रामसेविका बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Rajnikant Gaikwad as the President of Jawali Taluka Gramsevak Sanghatana